सणासाठी भावाकडे गेलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सणासाठी भावाकडे गेलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापुरातील शास्त्री नगर भागातील नदीम फकीर या तरुणाने कुंभारी येथील शेतात जाऊन सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुरातील शास्त्री नगर भागातील नदीम फकीर या तरुणाने कुंभारी येथील शेतात जाऊन सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नदीम हा विजभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होता.

बकरी ईद दिवशी सकाळी नमाज पठण करून तो कुंभारी येथील विडीघरकुलमध्ये राहणाऱ्या भावाला ईदच्या शुभेच्छा देऊन येतो,असे म्हणून घरातून गेला. परुंतु तो परत आलाच नाही.

हे देखील पहा-

आज दोन दिवसानानंतर त्याचा मृतदेह तुकाराम पवार यांच्या शेतात आढळून आला आहे. तुकाराम पवारांच्या शेतातील पडक्या घरातील पायपाला कापडाच्या सुताने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोलापूर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स बोलावून नदीम फकीर याला शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,नदीमने वीटभट्टी वरील मालकाकडून कांही पैसे उचल घेतले होते.

त्यानंतर मात्र तो काम सोडून घरात बसला होता. वीटभट्टीमालक त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होता. पैसे देत असताना मालक पैसे न घेता तू कामाला ये,असं म्हणत होता. या त्रासाला नदीम फकीर कंटाळला होता, अशी माहिती नदीमच्या पत्नीने दिली आहे. त्याला आठ वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padwal Bhaji Recipe : नावडती पडवळची भाजी होईल आवडती; एकदा ट्राय करा 'ही' रेसिपी, दोन घास जास्तच जातील

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

kidney Health Diet: किडनीचा त्रास असणाऱ्यांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत?

Nightclub Fire : गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २३ जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

SCROLL FOR NEXT