भारत बंदमध्ये साखर कामगारांनी सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी..   विजय पाटील
महाराष्ट्र

भारत बंदमध्ये साखर कामगारांनी सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी...  

सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखानामध्ये कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नरेंद्र मोदी चले जाओ अश्या घोषणा कामगारांनी दिल्या.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: कृषी कायदा आणि कामगार विरोधी धोरण असणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आज सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखानामध्ये कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नरेंद्र मोदी चले जाओ अश्या घोषणा कामगारांनी दिल्या. (Sugar workers took part in Bharat Bandh and shouted slogans against the Central Government)

हे देखील पहा -

देशातील आणि पंजाब राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने दडपशाहीने लागू करू पहात असलेले तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत आणि शेतीमालाला ५०% नफ्यासह  हमीभाव मिळावा म्हणून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच देशातील प्रमख देशव्यापी केंद्रीय कामगार संघटना राज्यव्यापी फेडरेशन निरनिराळ्या स्वतत्र कामगार सघटना ही शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घ्यावेत व शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून सक्रिय झालेल्या आहेत. 

या मागण्यांबरोबरच केंद्र सरकारने कामगार विषयक ४४ कामगार कायदे मोडीत काढून मोठ बड्या भांडवलदार व कारखानदारांना अनुकूल कामगार विरोधी धोरण अवलंबणेचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आणि त्यांच्या जनविरोधी भूमिकांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यालाच पाठिंबा देत आज सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखानामध्ये कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

SCROLL FOR NEXT