Surabhi Jayashree Jagdish
कानातील मळ (Earwax) हा नैसर्गिकरित्या तयार होणारा पदार्थ असून तो धूळ, जंतू आणि इतर घाण कानात जाण्यापासून संरक्षण करतो. साधारणपणे हा मळ हळूहळू बाहेर येतो आणि वेगळे काही करण्याची गरज भासत नाही.
कानातील मळ काढण्यासाठी कापसाच्या काड्या, हेअरपिन, माचिसची काडी किंवा इतर टोकदार वस्तू वापरणं टाळावं. अशा वस्तूंमुळे मळ आणखी आत ढकलला जाऊ शकतो आणि कानाच्या पडद्यालाही इजा होण्याचा धोका वाढतो.
अर्धा चमचा मीठ कोमट पाण्यात मिसळून त्यात स्वच्छ कापूस भिजवावा. हा कापूस काही मिनिटांसाठी कानाच्या बाहेरील भागाजवळ हलक्या हाताने ठेवावा. त्यामुळे मळ मऊ होण्यास मदत होऊ शकते आणि तो नैसर्गिकरित्या बाहेर येऊ शकतो.
नारळाचं किंवा बदामाचं तेल किंचित कोमट करून त्याचे २ ते ३ थेंब कानात टाकता येतात. हे तेल ५ ते १० मिनिटं कानात राहू द्यावं आणि त्यानंतर डोकं एका बाजूला झुकवावं. त्यामुळे मळ मऊ होऊन बाहेर येण्यास मदत होऊ शकते.
गरम पाण्याच्या भांड्यातून १० ते १५ मिनिटं वाफ घेतल्याने कानातील मळ मऊ होण्यास मदत मिळू शकते. वाफ घेताना डोक्यावर टॉवेल ठेवून काळजीपूर्वक प्रक्रिया करावी. त्यानंतर मळ नैसर्गिकरित्या बाहेर येण्याची शक्यता वाढते.
हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. ते समान प्रमाणातील पाण्यात मिसळून काही थेंब कानात टाकले जातात आणि काही मिनिटांनंतर कान स्वच्छ केला जातो. चुकीच्या वापरामुळे कानाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे स्वतःहून हा उपाय करू नये.
कानात तीव्र वेदना, खाज, पू येणं किंवा ऐकू कमी येणं अशी लक्षणं दिसल्यास त्वरित कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कान वारंवार स्वतः साफ करण्याऐवजी आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करून घेणं अधिक सुरक्षित असतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.