काबुल: केस कापताना शरीया कायद्यानुसार (Shariya Law) नियमांचं पालन करा, क्लीन शेव्ह (Clean Shave) तसेच अमेरिकन हेअर स्टाईल (Hair Dtyle) करु नका असा फर्मान तालिबानने (Taliban) जारी केला आहे.अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) तालिबानतची सत्ता आल्यानंतर आता तालिबाबने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुल (Kabul) शहरात आणि हेलमंड प्रांतामधील सलून्समध्ये (Salon) जाऊन त्यांनी केस कापणाऱ्यांना हे आदेश दिले आहेत तसेच सलूनच्या बाहेर आदेशाची प्रतही चिकटवण्यात आली आहे. बीबीसीने ही बातमी दिली आहे.
हे देखील पहा -
या बातमीनुसार, काबुलमधल्या एका न्हाव्यानं म्हटलं, "तालिबानचे सैनिक सतत येत आहेत आणि आम्हाला दाढी न करण्याचा आदेश देत आहेत." तसेच "आम्हाला पकडण्यासाठी ते अंडरकव्हर इन्स्पेक्टरही पाठवू शकतात," असं दुसऱ्या एका न्हाव्यानं म्हटलं. शहरातील एक मोठं सलून चालवणाऱ्या न्हाव्यानं सांगितलं, "आम्हालाही एक फोन आला आणि त्या व्यक्तीनं स्वत:ची ओळख सरकारी अधिकारी अशी सांगितली. अमेरिका स्टाईलचं पालन करणं थांबवा आणि कुणाचीही दाढी करणं थांबवा, असं तो म्हणाला." १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता असताना पुरुषांना आकर्षित करणारी हेअरस्टाईल ठेवण्यास निर्बंध घातले होते. तसंच पुरुषांच्या दाढी वाढवण्यावर जोर दिला होता.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासूनच तिकडे मानव अधिकारांचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोणी कसे कपडे घालावे, केशरचना कशी ठेवावी, काय करावे अन् काय करु नये अशा वैयक्तिक बाबींवरही तालिबान नियंत्रण ठेवत आहे. यात स्त्रियांची अवस्था सर्वात दयनीय आहे. स्त्रियांना हिजाब परिधान करणं सक्तीचं केलं आहे, याशिवाय घरातील पुरुषाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास बंदी, नोकरी करण्यास बंदी असे अनेक निर्बंध लादले गेले आहे. तालिबानने घोषीत केलेल्या मंत्रीमंडळात अद्याप एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.