Digital Health ID: आरोग्याविषयी माहिती देणारं प्रत्येक नागरिकाचं असेल डिजिटल कार्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष्यमान भारत डिजिटल आरोग्य मिशन लॉंच केले. याअंर्गत आता प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यविषयी माहिती देणारे डिजिटल कार्ड असेल.
Digital Health ID: आरोग्याविषयी माहिती देणारं प्रत्येक नागरिकाचं असेल डिजिटल कार्ड
Digital Health ID: आरोग्याविषयी माहिती देणारं प्रत्येक नागरिकाचं असेल डिजिटल कार्डSaam Tv News
Published On

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज आयुष्यमान भारत डिजिटल आरोग्य मिशन (ayushman bharat digital health mission) लॉंच केले. याअंर्गत आता प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यविषयी माहिती देणारे डिजिटल कार्ड असेल. (ayushman bharat digital card) आधारकार्ड प्रमाणेच हे डिडिटल कार्ड असेल. या डिजिटल कार्डचा फायदा असा की, या कार्डमध्ये आपल्या आरोग्याविषयक माहिती आणि आपली मेडिकल हिस्ट्री साठवलेली असेल. यामुळे दवाखण्यात जाताना आपल्याला जुन्या फाईल्स किंवा आरोग्याविषयक रिपोर्ट्स सोबत घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. देशभरात हे कार्ड वापरु शकतो. (Digital Health ID: Every citizen will have a digital card to provide health information)

हे देखील पहा -

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, "गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज तो एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मोहिमेची सुरूवात करण्यात येत आहे, ज्यामध्ये भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतीकारी बदल आणण्याची ताकद आहे," असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. "डिजिटल इंडिया या मोहिमेनं सामान्यांची ताकद अधिक वाढवली आहे. आज आपल्या देशातत १३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी मोबाईल वापरकर्ते, ८० कोटी इंटरनेट वापरकर्ते आणि ४३ कोटी जनधन बँक खाती आहेत. असं जगात अन्य ठिकाणी कुठेही नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मोदी आरोग्य ओळखपत्राची घोषणा केली. आरोग्य ओळखपत्र हे देशातील आरोग्य क्षेत्रातील एक अतिशय क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. हे आरोग्य ओळखपत्र प्रथम अंदमान आणि निकोबार, चंदीगड, लडाख, लक्षद्वीप, पुदुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमन दीव या ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आले. आता ते देशभरात लागू केले जात आहे.

घरबसल्या डिजिटल हेल्थ कार्ड कसं बनवाल?

जर तुम्हाला तुमचे डिजिटल आरोग्य कार्ड बनवायचे असेल तर त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान ndhm.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला तुमचे युनिक डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्याचा पर्याय दिसेल (हेल्थ आयडी तयार करा) या पर्यायावर क्लिक केल्याने तुमची कार्ड निर्मिती प्रक्रिया सुरू होईल.

सर्वप्रथम, तुम्हाला आधार कार्डची माहिती विचारली जाईल. तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि नंतर OTP टाकून त्याची पडताळणी करावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही आधार माहिती न देता हेल्थ कार्ड बनवणे निवडू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण फक्त आपला मोबाईल नंबर देऊन बनवलेले आरोग्य कार्ड मिळवू शकता. मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला OTP द्वारे त्याची पडताळणी करावी लागेल.

Digital Health ID: आरोग्याविषयी माहिती देणारं प्रत्येक नागरिकाचं असेल डिजिटल कार्ड
जागतिक पर्यटन दिन २०२१: जागतिक वारसा असलेल्या महाराष्ट्रातील या ठिकाणी भेट द्यायलाच हवी

तुम्हाला तुमच्या प्रोफाईलसाठी फोटो, तुमची जन्मतारीख, पत्ता यासह काही माहिती द्यावी लागेल. यासाठी तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, ज्यात माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर, तुमच्या समोर एक आरोग्य ओळखपत्र दिसेल, ज्यात तुमची माहिती, फोटो तसेच QR कोड असेल. या कार्डद्वारे तुम्हाला भविष्यात अनेक सुविधा मिळतील.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com