आगामी काळात साखरेचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या हंगामात देशातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.
इस्माने साखर उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला
राज्यात साखरेचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. कारण, यंदाच्या हंगामात देशातील साखर उत्पादन नीचांकी पातळी गाठण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. इंडियन शुगर ॲण्ड बायो-एनर्जी मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन म्हणजेच ‘इस्मा’नं यंदाच्या गाळप हंगामातील साखर उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केलाय. देशातील ऊस उत्पादक राज्यांमध्ये पिकाची परिस्थिती यंदा वेगवेगळी आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा फटका ऊसाला बसला आहे. तर काही राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादनात घट दिसून आल्याचं ‘इस्मा’नं म्हटलंय.
इस्मानं देशांतर्गत साखर उत्पादनाबाबत वर्तवलेला अंदाज नेमका काय आहे पाहूयात. उत्पादन घटणार, साखर महागणार?
2026-27च्या हंगामात देशातील साखर उत्पादन 5 टक्क्यांनी घटून 265 लाख टनांवर स्थिरावणार
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादनात सर्वाधिक 12% घट होऊन 87 लाख टनापर्यंत खाली येणार
'एल निनो'मुळे देशातील गाळपासाठी उपलब्ध ऊस क्षेत्र यंदा 3 टक्क्यांनी कमी झालंय
केंद्र सरकारकडून यंदा उसाचा रस आणि साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर पूर्णपणे बंदी
कर्नाटकात 7 टक्के, तर यूपी आणि गुजरातच्या साखर उत्पादनात 1 टक्का घट होणार
दरम्यान, देशात दरवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात किती तफावत निर्माण होण्याची चिन्हे आहेत पाहूयात.
देशातील साखरेचं संभाव्य उत्पादन आणि वापर
अंदाजित किमान उत्पादन - 265 लाख टन
वार्षिक गरज - 290 लाख टन
आयात करणार - 20 लाख टन
यंदा देशात प्रतिकूल हवामानामुळे साखर उत्पादन घटण्याचं सावट निर्माण झालंय. सप्टेंबर 2027 अखेरपर्यंत शिल्लक साठा 20 ते 25 लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. याबाबत तज्ज्ञांनी काय म्हटलंय पाहूयात.
विशेष म्हणजे, भारतानं मेमध्ये अचानक साखर निर्यातीवर निर्बंध आणून 10 लाख टन साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. मात्र, तरीही देशांतर्गत साखरेच्या उपलब्धतेत फारशी सुधारणा झालेली नाहीये. त्यातच आता पुन्हा देशातील प्रतिकूल परिस्थितीमुळे साखर आयातीचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत. त्यामुळे आगामी काळात देशात साखरेचे भाव वाढण्याची चिन्हे असून सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.