SUGAR PRICE HIKE BEFORE DIWALI saam tv
महाराष्ट्र

दिवाळीच्या तोंडावर साखरेचा गोडवा महागला! आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?

Sugar Price Hike Before Diwali Retail Wholesale Rates India: दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 4 रुपयांहून अधिक वाढ झाली असून किरकोळ दर 59.50 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकात्यात साखरेचे दर किती आहेत? जाणून घ्या.

Omkar Sonawane

ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामन्यांच्या खिशाला महागाईचा फटका बसत आहे. गेल्या महिनाभरातच बाजारामध्ये साखरेच्या दरात प्रतिकिलो 4 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. एकीकडे साखरेचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे साखरेचे दर मात्र वाढत असल्याचे चित्र आहे.

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, साखरेचा सरासरी किरकोळ दर प्रतिकिलो 59.50 रुपये, तर घाऊक दर 55.40 रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे वर्षभराच्या तुलनेत साखरेच्या साखरेच्या दरात प्रतिकिलो 12 ते 13 रुपयांची वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी किरकोळ बाजारात साखरेचा दर 46.50 रुपये, तर घाऊक बाजारात 43.23 रुपये होता.

तर राजधानी कोलकत्तामध्ये साखरेचे दर सर्वाधिक वाढल्याचे दिसून येत आहेत. 3 नोव्हेंबर रोजी कोलकात्यात साखरेचा दर प्रतिकिलो 65 रुपये नोंदवण्यात आला. वर्षभरापूर्वी हाच दर 50 रुपये होता. तर दिल्लीत साखरेचा दर 64 रुपये आणि मुंबईत 61 रुपये प्रतिकिलो झाला आहे. वर्षभरापूर्वी दिल्लीत 46 रुपये, तर मुंबईत 45 रुपये प्रतिकिलो दर होता.

साखरेचे दर वाढण्यामागे नेमकं कारण काय?

2025-26 या हंगामात साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे बाजारात दरवाढीचा परिणाम झाला आहे. त्यातच सणासुदीच्या काळातील वाढती मागणी, पिकांचं नुकसान, जागतिक बाजारपेठेतील मर्यादित पुरवठा आणि साखरेची साठेबाजी यामुळे दर आणखी वाढले आहेत. दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर मर्यादा घालणे, आयातीला प्रोत्साहन देणे आणि बाजारातील साठ्यांवर देखरेख ठेवणे यांसारख्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच साखर कारखान्यांचा गाळप हंगामही लवकर सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : एसटीच्या चाकाखाली चिरडून एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

Maharashtra News Live Update: शिवाजीनगर न्यायालयासमोरील हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल, 10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलिस दलात खळबळ

Grocery Price Hike : कांदा-साखर महागली, डाळी-तांदळाचे भावही वाढले; किराणा बाजारातील नवे दर वाचाच

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या माझ्यावर अन्याय....

SCROLL FOR NEXT