Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Saamtv
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar: 'लंडनहून येणारी वाघनखं महाराजांशी संबंधितच', सुधीर मुनगंटीवारांचे विधानसभेत स्पष्टीकरण; पाहा VIDEO

Maharashtra Assembly Monsoon Session 2024: "आम्ही इतर ठिकाणीही चौकशी केली, त्यानंतर पुरावे ‌बघितले. व्हीक्टोरिया संग्रहालयात तेच वाघनखं असल्याचं दिसून येत असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

Gangappa Pujari

सुनील काळे| मुंबई, ता. ११ जुलै २०२४

व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा मोठा दावा इतिकास संशोधककार इंद्रजित सावंत यांनी केला आहे. यानंतर विरोधकही आक्रमक झाले असून राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही चर्चा झाली. ज्याला उत्तर देताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही वाघनखे महाराजांशीच संबंधित असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

"शिवाजी महाराज आमचे प्राण आहेत. हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. अस्मितेशी संबंधित मुद्द्यावर चर्चा करता येत नाही. कोणत्याही जातीचा, धर्माचा असू द्या त्याच्या रक्तात शिवबा आहे. ५ नोव्हेंबर २०२२ पासून अनेक शिवभक्तांची मागणी होती की, अफजलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवलं पाहिजे. १० नोव्हेंबर २०२२ अफजलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण काढलं.

त्याचदिवशी १० नोव्हेंबर १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. त्याचदिवशी ते अतिक्रमण हटले. त्यानंतर शिवभक्तांमध्ये उत्साही आला. त्यांनी वारंवार मागणी करत लंडनच्या म्युझियममधील वाघनखांची माहिती दिली. या माहितीनंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखे शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यासंबंधी पत्रव्यवहार सुरू केला.

यासंबंधी ब्रिटनच्या पंतप्रधान तसेच म्युझियमच्या प्रमुखांशी चर्चा केली. तत्कालीन आलेल्या बातम्या आणि घटना बघता ती वाघनखं संबंधित असल्याचं दिसून येत आहे. आम्ही इतर ठिकाणीही चौकशी केली, त्यानंतर पुरावे ‌बघितले. व्हीक्टोरिया संग्रहालयात तेच वाघनखं असल्याचं दिसून येत असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

दरम्यान, तीन वर्ष वाघनखं महाराष्ट्रात राहतील, असा निर्णय घेण्यात आला असून १९ जुलैला ही वाघनखं साताऱ्यातल्या संग्रहालयात आणणार आहे. ही वाघनखं आणण्यासाठी भाडं दिलं जाणार नाही. यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला नसूव फक्त १४ लाखांचा खर्च झालेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT