Sudhir Mungantiwar on Rahul Shewale Saam Tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election: '२२ जागा लढवायच्या आहेत, हे माईकवर सांगायची आवश्यकता नाही', मुनगंटीवारांचा शिंदे गटाच्या नेत्यावर निशाणा

Sudhir Mungantiwar on Rahul Shewale: '२२ जागा लढवायच्या आहेत, हे माईकवर सांगायची आवश्यकता नाही', मुनगंटीवारांचा शिंदे गटाच्या नेत्यावर निशाणा

Satish Kengar

>> चेतन व्यास

Sudhir Mungantiwar on Rahul Shewale:

राज्यात शिंदे आणि भाजप एकत्र येतेय सत्ता स्थापन केली. यानंतर अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजप आणि शिवसेनेला साथ देत सत्तेत सहभागी झाले. यातच आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या गटाला जास्त जागा मिळाव्या यासाठी तिन्ही पक्षाकडून प्रयत्न केले जातं आहे.

अशातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत शिंदे गटाला महाराष्ट्रात 22 जागा लढाव्याचे आहे, असं वक्तव्य केलं आहे. यावरच आता मंत्री मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'असं माईकवर सांगितलं जातं काय, त्यांना २२ जागा लढायच्या आहेत, हे माईकवरून सांगायची आवश्यकता नाही. त्यांना 22 जागांवर निवडणूक लढवायची आहे, हे त्यांनी जेव्हा सर्वपक्षीय म्हणजेच आमच्या तीन पक्षाची बैठक एकत्र होईल, तेव्हा आपलं मत मांडावं.''

मुनगंटीवार म्हणाले की, ''कोणी किती जागा लढवायच्या हे त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते, त्या ठिकाणी केलेलं सर्व्हे आहेत आणि पक्षाची ताकद, याआधारे ठरवलं जातं. आकड्यांच्या आधारावर युती होत नाही. युती तर एकमेकांच्या सहकार्याने, त्या ठिकाणचे आकलन, मुल्यांकन करून होत असते. त्यांनी सहज आपली इच्छा व्यक्त असेल आणि आमच्यामध्ये एक सूर एक विचार आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात हा देश जगाचा कप्तान व्हावा. वसुधैव कुटुंबकम् हा जो आमचा भाव आहे, या भावनेने जगामध्ये आमच्या देशाचा गौरव वाढावा. आपल्या देशातील गरीबातील गरीब माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा. त्याच्या आयुष्यातील गरीबीचा अंधार दूर व्हावा, या दृष्टीने नरेंद्र मोदी काम करत आहेत. कोण खासदार होईल, कोण आमदार होईल, यासाठी कधीच काम नाही केलं नाही.''

मुनगंटीवार म्हणाले, ''एका राजकीय नेत्याने दुसर्‍या राजकीय पक्षावर टीका करत असताना संयमीत, मर्यादीत आणि तर्कसंगत टीका केली पाहिजे. राजकारणात याअगोदर ही पद्धत कधीच नव्हती. पण, काही वर्षांपासून आपण बघितलं चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल भाष्य करताना, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भाष्य करताना जो निम्नस्तर काही लोकांनी, काही राजकीय नेत्यांनी किंवा त्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी गाठला आहे. तो दुर्देवी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT