RBI ने ICICI आणि कोटक बँकेवर केली मोठी कारवाई, ग्राहकांना बसणार फटका?

RBI ने ICICI आणि कोटक बँकेवर केली मोठी कारवाई, ग्राहकांना बसणार फटका?
RBI fines Kotak Mahindra Bank and ICICI Bank
RBI fines Kotak Mahindra Bank and ICICI Bank Saam Tv
Published On

RBI fines Kotak Mahindra Bank and ICICI Bank:

रिजर्व बैंकने काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बँके बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने आयसीआयसीआय (ICICI) बँकेला 12.19 कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, कर्ज, आगाऊ तरतुदीशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन, फसवणूक करणारे वर्गीकरण आणि बँकांद्वारे अहवाल देण्याशी संबंधित मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी हा दंड आयसीआयसीआय बँकेला ठोठावला आहे.

RBI fines Kotak Mahindra Bank and ICICI Bank
Government schemes: महिलांसाठी बेस्ट आहेत 'या' सरकारी योजना, गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त व्याज

रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले की, आर्थिक सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई बँकेच्या रिकव्हरी एजंट, ग्राहक सेवा, कर्ज आणि आगाऊ तरतुदीच्या त्रुटींशी संबंधित आहे. (Latest Marathi News)

आरबीआयच्याच्या म्हणण्यानुसार, दोन्ही प्रकरणांमध्ये दंड आकारण्याचे पाऊल बँकांनी नियामक तरतुदींचे पालन करताना केलेल्या त्रुटींवर उचलले गेले आहे. यामागील हेतू कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर कोणताही निर्णय देणे नाही.

RBI fines Kotak Mahindra Bank and ICICI Bank
PPF Scheme: सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल श्रीमंत, 10 हजार रुपये गुंतवून 32 लाख कमावण्याची संधी

दरम्यान, आरबीआय ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे, जी व्याजदरापासून बँकिंग नियम बनवते. ज्याचे पालन बँकांना करावे लागते. जर कोणत्याही बँकेने या नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा त्याचे उल्लंघन केले तर आरबीआय त्याच्यावर कारवाई करते. अनेक प्रसंगी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करताना बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com