Elephant Project In State saam tv
महाराष्ट्र

Elephant Project : व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबवणार, हत्ती संवादकाची मदत घेणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Elephant Project In State : राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

Chandrakant Jagtap

>> सुशांत सावंत

Sudhir Mungantiwar About Elephant Project In State : राज्यात व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर हत्तीप्रकल्प राबवण्याचा विचार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार करत आहेत. राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

मुनगंटीवार यांनी व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वन विभागाला दिला आहेत. तसेच वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवासंदर्भात चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर , वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख वाय एल पी राव, प्रधान मुख्यवनसंरक्षक महिप गुप्ता आदी अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान यावर सविस्तर चर्चा करताना मुनगंटीवार म्हणाले, या समस्येवर केवळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हा उपाय नसून वन्य प्राण्यांना विशेषतः हत्तीना गावापर्यंत, शेतांपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी काय योजना करता येतील याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी हत्ती संवादकाची मदत घेता येईल असेही त्यांनी सूचविले. देशातील नऊ राज्यात वन्य हत्तींशी संवाद साधून त्यांना नियंत्रित करणारे प्राणी संवादक आनंद शिंदे यांच्या कामांविषयी सादरीकरणही यावेळी करण्यात आले. (Latest Marathi News)

पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी देशातील उद्योग जगताकडून मिळणाऱ्या सीएसआर निधीपैकी शून्य पूर्णांक पाच टक्के निधी देणे बंधनकारक करावे अशी विनंती केंद्र शासनाला केली जाईल असे ते म्हणाले. तसेच हत्तींना गावापर्यंत येण्यास रोखण्यासाठी एलिफंट प्रूफ फेन्स अर्थात एपीएफसाठी मनरेगा या योजनेतून निधी मिळावा या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जंगलातील झाडे कटाई बाबत परवानगी देताना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि ऑफलाइन परवानगी बंद करण्याचे निर्देश ना मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. कोल्हापूर जिल्ह्यात गवा या प्राण्यांचा उपद्रव गंभीर असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद वाढविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

Railway : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पहिला आरक्षण चार्ट प्रसिद्ध केला जाणार

Maharashtra Live News Update : अलिबाग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या PNP नाट्यगृहाचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

MS Dhoni: कॅप्टन कूल धोनी क्रिकेटशिवाय 'या' कामांमधून कमवतो कोट्यवधी रुपये

SCROLL FOR NEXT