Nana Patole's strong reply to Chandrasekhar Bawankule : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार असल्याची शक्यता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींनाना इशारा दिला होता. "राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा" असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते.
बानवकुळे यांच्या या इशाराला नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राहुल गांधी हे महाराष्ट्रात येतील. तुम्हची धमक असेल तर राहुल गांधी यांच्या केसाला धक्का लावून दाखवा, जशास तसं उत्तर देऊ', असा सूचक इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष पटोले यांनी बावनकुळेंचं नाव न घेता दिला आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकाद सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले...?
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) म्हणाले की ''स्वा. सावरकरांचा राहुल गांधी यांनी पाच वेळा अपमान केला. त्यांनी ही भूमिका अद्यापही बदलली नसून त्यांनी माफीही मागितली नाही. ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी, अशी माझी मागणी असल्याचं बावनकुळे म्हणाले. (Latest News Update)
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, "सावरकरांची ज्याप्रकारे अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, एकदाच नाही तर पाच वेळा जाणीवपूर्वक स्वा. सावरकर यांचं नाव घेऊन टीका केली. सावरकर यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका असं त्यांना अनेकांनी वारंवार समजावलं. तुमची ती उंची नाही. तरीही त्यांनी अपमान केला', असे बावनकुळे म्हणाले.
तसेच 'महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा', असा इशारा देखील त्यांनी दिला.
राहुल गांधी यांच्या केसाला धक्का लावून दाखवा - पटोले
बावनकुळे याच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राहुल गांधी हे महाराष्ट्रात येतील, तुम्हची धमक असेल तर राहुल गांधींच्या केसाला धक्का लावून दाखवा. जशास तसे उत्तर देऊ' असा सूचक इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
नाना पटोले म्हणाले, नरेद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खलिस्थानी आंदोलन जीवी म्हटले होते. त्यासाठी त्यांनी कधीच माफी मागितली नाही. माजी राज्यपाल कोश्यारी यांनी अनेकदा संताच्या अपमान केला, त्याबद्दल भाजप वाल्यांनी कधी माफी मागितली नाही.
बेरोजगारी, महागाई वाढवली जनतेची माफी कोण मागणार यांची उत्तरे आधी भाजपने द्यावी असेही नाना पटोले म्हणाले. या सारख्या फालतू गोष्टी करून भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
Edited By- Chandrakant Jagtap
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.