Lightning In Rahuri: भयंकर! तुफान पावसात शेतात भिजणारा कांदा झाकायला गेले, ३ सख्ख्या भावंडांवर कोसळली वीज

Ahemadnagar Lightning News : अवकाळी पावसात तीन सख्ख्या भावंडांवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत एका वृद्ध शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
Lightning In Rahuri
Lightning In Rahurisaam tv
Published On

>> विलास कुलकर्णी

Rahuri Lightning News : राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर कालपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राहुरी येथे झालेल्या तुफान पावसात तीन सख्ख्या भावंडांवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाजा मृत्यू झाला तर दोन भाऊ जखणी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे गुरुवारी रात्री साडेदहा वाजता पाची महादेव वस्तीवर जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतात काढलेला कांदा पावसात भिजू नये म्हणून तो झाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन सख्या भावांच्या अंगावर वीज कोसळली.यात एक जणाचा मृत्यू झाला तर, दोन जण जखमी झाले. भाऊसाहेब रघुनाथ गांधले (वय ४५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर त्यांचे भाऊ भास्कर रघुनाथ गांधले आणि सुनील रघुनाथ गांधले गंभीर जखमी झाले.

Lightning In Rahuri
Maharashtra COVID 19 cases : भीती खरी ठरतेय, कोरोना वाढतोय; २४ तासांत ११५२ नवे रुग्ण, ४ मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार गांधले यांनी नुकताच काढलेला कांदा शेतात ठेवलेला होता. परंतु गुरुवारी रात्री 10 वाजता अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे भाऊसाहेब, भास्कर आणि सुनील हे तिघे भाऊ कांदा झाकण्यासाठी घराबाहेर पडले.

पावसात शेतातील कांदा भिजू नये म्हणून त्यांनी तो झाकूनही ठेवला. परंतु शेतातून परत घराकडे येताना त्यांच्या त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात तिघेही गांधले बंधू जखमी झाले. या घटनेत भाऊसाहेब गांधले यांना बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. (Latest Marathi News)

या घटनेनंतर शुक्रवारी तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, तनपुरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी मृत शेतकरी गांधले यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Lightning In Rahuri
Maharashtra Politics : राज्याचं राजकारण तापलं! राहुल गांधींच्या केसाला धक्का लावून दाखवा! जशास तसं उत्तर देऊ, नाना पटोलेंचा इशारा

सांगलीत वीज कोसळून वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबडची येथे वीज पडून एक वयोवृद्ध शेतकरी आणि दोन म्हैशाची जागीच मृत्यू झाला आहे. संगप्पा सनाप्पा पुजारी (वय ७० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. संगप्पा जनावर घेऊन घरी जात असताना सायंकाळी पाच वाजता विजेच्या गडगटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह सुरू झालेल्या या पावसात संगप्पा यांच्या अंगावर वीज कोसळली. याबाबत ग्रामस्थांनी जत तहसीलदार कार्यालय आणि पोलीस पाटील यांनी जत पोलिसांना माहिती दिली. (Ahemadnagar News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com