Maharashtra COVID 19 cases : भीती खरी ठरतेय, कोरोना वाढतोय; २४ तासांत ११५२ नवे रुग्ण, ४ मृत्यू

Maharashtra Corona Cases: गेल्या २४ तासांत राज्यात ११५२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra COVID 19 cases
Maharashtra COVID 19 cases SAAM TV
Published On

Maharashtra Corona Report Today : जी भीती होती, तीच आता खरी ठरताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हातपाय पसरणारा कोरोना डोके वर काढू लागलाय. राज्याच्या आरोग्य विभागाने आज, शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ११५२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने गेल्या २४ तासांतील कोरोना अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, आज शुक्रवारी (१४ एप्रिल २०२३) ११५२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,५४,५२९ झाली आहे. Latest News Update)

Maharashtra COVID 19 cases
Vertigo Disease Symptoms: चालताना गरगरल्यासारखे वाटते ? असू शकतो व्हर्टिगोचा आजार, जाणून घ्या लक्षणे

महाराष्ट्र सरकारची चिंता वाढवणारा कोरोना अहवाल समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या वर नोंदवली गेली आहे. गेल्या २४ तासांत ११५२ नवे रुग्ण आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra COVID 19 cases
Maharashtra Weather Forecast: राज्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा बसणार! वाचा कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका?

महत्वाच्या अपडेट्स

आज ९२० रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ८०,००,१२६ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११ टक्के इतके आहे.

आज राज्यात ११५२ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज ४ करोनाबाधित रुग्णांच्या मत्यूची नोंद झाली आहे.

सध्या राज्यातील मत्यूदर १.८२ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६७,७२,००६ प्रयोगशाळा नमन्यांपैकी ८१,५४,५२९ (०९.४०

टक्के) नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे आणखी एकाचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा ९० वर पोहोचला

सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर एकूण ९० जणांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तसेच कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आज दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण ९० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. (रिपोर्ट - ओंकार कदम)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com