Success Story Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, अडचणींवर मात करत केली MPSC क्रॅक; सोलापूरच्या शेतकऱ्याची लेक झाली सरकारी अधिकारी

Success Story of Solapur Girl Kajal Baby Vilas Bhosale: सोलापूरच्या काजल बेबी विलास भोसले यांनी स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळवले आहे. त्यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर निवड झाली आहे.

Siddhi Hande

सोलापूरच्या लेकीची यशोगाथा

काजल बेबी विलास भोसले यांनी क्रॅक केली MPSC

सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर निवड

अक्षय गुंड, सोलापूर

प्रत्येकजण काही न काही स्वप्न पाहतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात. स्वप्न पूर्ण होतात परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. अशीच मेहनत सोलापूरच्या काजल बेबी विलास भोसले यांनी घेतली. त्यांनी स्पर्धा परीक्षेत चांगलंच यश मिळवलं आहे.

फोंडशिरस येथील साध्या कुटुंबातून आलेल्या काजल बेबी विलास भोसले यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण, आदिवासी विभाग) या पदाला गवसणी घातली आहे. ग्रामीण भागात जन्मलेली, आर्थिक परिस्थिती बेताची आणि अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी गाठलेले यश आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

गावातून मोठ्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास

काजल यांनी आपले प्राथमिक शिक्षण कुंभारमळा येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी श्री बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस येथे माध्यमिक शिक्षण घेतले. कॉलेसाठी त्यांनी नातेपुते येथील बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला व ज्युनिअर कॉलेज गाठले. त्यानंतर बारामतीत येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण करत त्यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी परिस्थितीशी झुंज देत सातत्य राखले.

भावंडांकडून मिळालेली दिशा

काजल यांच्या आयुष्यात अधिकारी होण्याची प्रेरणा त्यांच्या भावांमुळे निर्माण झाली. त्या नववीत असताना त्यांच्या दोन भावांची पोलीस सेवेत निवड झाली. त्याचबरोबर एक भाऊ UPSC ची तयारी करत होता. घरातच स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार झाले आणि त्यातून काजल यांनी दहावीमध्येच ठरवले. आपल्यालाही अधिकारी व्हायचे, असं ठरवलं आणि त्यांनी प्रयत्न सुरु केले.

बालपण

काजल यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. वडील चौथीपर्यंत शिक्षित, तर आई दहावीपर्यंत शिकलेली. एक एकर शेती आणि त्यातही पाण्याची टंचाई. त्यामुळे कुटुंबाला सहा महिने वीटभट्टीवर आणि सहा महिने गवंडी काम करावे लागयेच.

घरातील आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टीही मिळत नसायच्या. गणवेश, परीक्षा फी, स्पर्धा यासाठी पैसे नसल्यामुळे अनेक गोष्टींपासून दूर राहावे लागले. आई-वडील रात्री कामावर असल्यामुळे घरातील जबाबदाऱ्या देखील काजल यांनाच सांभाळाव्या लागत.

काजल यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे दहावीचे वर्ष. याच काळात त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा ठरवली. दहावीमध्ये ८७% गुण मिळवत त्यांनी स्वतःवर विश्वास निर्माण केला आणि मोठ्या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

दहावीतच UPSC करण्याचा निर्धार केला असला तरी काजल यांनी पदवीपर्यंत शैक्षणिक अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. बारावीला सायन्स आणि नंतर बी.एस्सी. (फिजिक्स) करत असताना त्यांनी ‘The Hindu’ सारखी वर्तमानपत्रे वाचायला सुरुवात केली, NCERT पुस्तके अभ्यासली. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

तयारीदरम्यान अनेक अडचणी आल्या. पुण्यात अभ्यासासाठी गेल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत कोरोना लॉकडाऊन लागला. त्यामुळे पुन्हा गावाकडे परतावे लागले. पुस्तकेही उपलब्ध नव्हती. एक वर्ष वाया गेल्याची भावना मनात होती. त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा पुण्यात येऊन तयारी सुरू केली. त्याचबरोबर अपयश, मानसिक ताण, आणि अभ्यासिकेतून दोन वेळा पुस्तके चोरीला जाणे अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. पण त्यांनी कधी हार मानली नाही.

काजल या दररोज ९ ते १० तास अभ्यास, परीक्षा जवळ आल्यावर १२ तासांपर्यंत अभ्यास करायच्या. तयारीच्या काळात त्यांनी सोशल मीडिया पूर्णपणे बंद ठेवले होते. मित्र-मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी संपर्कही मर्यादित ठेवला. दोन दिवसातून एकदा आई-वडिलांशी बोलणे एवढाच संपर्क ठेवून त्यांनी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.

काजल यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. विशेषतः त्यांचे भाऊ प्रमोद भोसले यांनी आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले. “मागण्याआधीच पैसे अकाउंटमध्ये टाकणे, सतत प्रोत्साहन देणे, परीक्षेची माहिती ठेवणे – हे सगळं त्यांनी केलं,” असे काजल यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Crime news India: IRS ऑफिसरच्या मुलीची हत्या; आधी लैंगिक अत्याचार, नंतर मोबाइलच्या चार्जरने गळा आवळला

Long Hair Hairstyles: लांब केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअरस्टाईल्स कोणत्या?

Plane Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत विमान कोसळलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT