Alfia Pathan Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: आई वडिलांच्या कष्टाला फळ, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अल्फीयाने नीटच्या परिक्षेत मिळवलं घवघवीत यश

Success Story Of Alfia Pathan clear Neet Exam: सोलापूरच्या अल्फीया पठाणने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. कोणतेही क्लासेस न लावता तिने स्वतः अभ्यास करुन चांगले मार्क्स मिळवले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. मेडिकल विषयाचा अभ्यास करण्यासाठी नीट परीक्षा दिली जाते. याच परीक्षेत सोलापुरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फीया पठाणने यश मिळवले आहे. अल्फीयाने ७२० पैकी ६१७ गुण मिळवले आहेत.

अल्फीया ही खूप कष्टाळू आणि अभ्यासू मुलगी आहे. तिने आपल्या आईवडिलांसाठी हे मोठे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे अल्फियाने कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता सेल्फ स्टडी करुन हे यश संपादित केले आहे. तिला चांगले गुण मिळाल्याने अल्फीयाच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. अल्फीयाचे वडिल मुस्तफा पटाण हे भाजी विक्रीचे काम करतात. तर आई समिना ही कपड्याच्या दुकानात कामाला जातात. हे दोघेही अल्प शिक्षित असूनही आपली मुलगी डॉक्टर व्हावी यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. डॉक्टर होण्याच्या पहिल्या टप्प्यात अल्फीयाने उत्तम कामगिरी केली आहे.

याबाबत अल्फीयाने माहिती दिली आहे. मला नीट परीक्षेत ६१७ गुण मिळाले आहे. यासाठी मी माझ्या कुटुंबियाचे, शिक्षकांचे सर्वांचे आभार मानेल. मी १२ पर्यंत कोणताही कोचिंग क्लास लावला नव्हता. म्हणून मला इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली. मी दिवसभर अभ्यास करायची. त्यामुळेच मी ही परीक्षा पास करु शकली, असं तिने सांगितले.

अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही अल्फीयाने हे यश मिळवले आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत करायची ताकद असल्यावर माणूस खूप मोठा होऊ शकतो, हे अल्फीयाने आपल्या कामगिरीतून दाखवले आहे. अल्फीयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अल्फीया आता लवकरच वैद्यकीय प्रवेशासाठी अर्ज करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT