Amravati News Saam Tv
महाराष्ट्र

शिक्षक नसल्याने विद्यार्थी बेहाल; उत्तमसरा झेडपी शाळेतील प्रकार, पालक संतप्त

या जिल्हा परिषद शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून गणित, विज्ञान आणि मराठी या विषयांना शिक्षकच नाही आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं आणि ते पिल्यावर सगळेजण गुरगुरतात. मात्र विद्यार्थ्यांना (Student) जर शिक्षणच मिळत नसेल तर याला म्हणावा तरी काय असाच प्रकार अमरावतीच्या उत्तमसरा जिल्हा परिषदच्या शाळेत घडला आहे. या जिल्हा परिषद शाळेत (School) गेल्या अनेक दिवसांपासून गणित, विज्ञान आणि मराठी या विषयांना शिक्षकच नाही आहे.

हे देखील पाहा -

अनेकदा पालकांनी शिक्षक देण्याची मागणी केली. तरी देखील शिक्षण विभागाकडून शिक्षक मिळालेला नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ही आंदोलन केले.

यावेळी दोन दिवसात शिक्षक शाळेला मिळतील असा आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे. सध्या शाळा सुरू झाल्यात. त्यामुळे शाळेत शिक्षक असणे फार गरजेचे आहे. कारण गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान झाल असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते. आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल. शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो. पण याच शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

SCROLL FOR NEXT