बुलढाणा - अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटोडा येथे शेतीच्या (Farm) वादामुळे झालेल्या हाणामारीमध्ये एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. तर या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी (Police) आरोपीनवर खुनाचा गुन्हा दाखल करून ७ आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील काटोडा शिवारामध्ये वामनराव धुड यांच्या शेताशेजारी गावातीलच बबन भिकाजी थिगळे यांची शेती आहे. त्या शेतीमध्ये काही दिवसांपूर्वी बबन थिगळे यांच्यासोबत धुऱ्यावरुन वाद झाले होते. त्यावेळी बबन थिगळे याच्या विरोधात पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. तेव्हापासून दोघांमध्ये यावरून नेहमीच वाद होत होते. दरम्यान काल शेतकरी वामनराव धूड यांची दोन्ही मुले दत्तात्रय धुड आणि विनोद धूड, भावजयी सुषमा धुड हे शेतामध्ये सोयाबीन लावत असतांना बबन थिगळे सह तीन ते चार जण हे आपल्या शेतामधुन हातात कुऱ्हाड, लाठ्या, काठ्या घेऊन आले.
हे देखील पाहा -
दरम्यान बबन थिगळे यांने पोलिसात रिपोर्ट का दिला असे म्हणत धूड कुटुंबाला शिवीगाळ करु लागला. तर काहीही न कळताच सोबत असलेल्या तीन ते चार जणांनी यांने आपल्या हातातील कुऱ्हाडीने, लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेत धूड बंधू गंभीर जखमी अवस्तेत आपला जिव वाचविण्याच्या उदृदेशाने जवळच्याच कवठळ गावी पलायन करत आपल्या नातेवाइकांकडे आसरा घेतला. मात्र चवताळलेल्या आरोपींनी काटोडा गावात जाऊन जखमी धूड बंधूच्या वृद्ध आई वडिलांनाही घरात घुसून जबर मारहाण केली आणि घरासमोर उभी असलेली चार चाकी गाडी, ट्रॅक्टरच्या काचा फोडल्या.
या घटनेत गंबीर जखमी झालेल्याना उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता कूषीवर्ताबाई धूड या ६५ वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जखमी असलेल्या दत्तात्रय धूड यांचे फिर्यादिवरुन अंढेरा पोलीसांनी खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बबन भिकाजी थिगळे, शाम बबन थिगळे, दिपक हनुमान सह इतर पाच जणांचा समावेश आहे.
या घटनेत वृद्ध महिला कुशीवर्ताबाई धुड यांचा मृत्यू झाल्याने महिलेच्या नातेवाईकांनी जोपर्यंत या घटनेतील दोषी आरोपीना अटक होत नाही, तोपर्यंत मृतक कुशीवर्ताबाई यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र पोलीसानी तात्काळ तपास पूर्ण करत या घटनेतील सर्व आरोपीना अटक केली आहे. तेव्हानातेवाईकांनी मृतक महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.