Police Recruitment Update
Police Recruitment Update Saam Digital
महाराष्ट्र

Police Recruitment News: पोलीस भरतीत अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यता; विद्यार्थ्यांची सरकारकडे मोठी मागणी

डॉ. माधव सावरगावे

Update on Police Recruitment Age Limit:

राज्य सरकारने पाच वर्षानंतर 17 हजार 471 पोलीस शिपाई पदांसाठी भरती जाहीर केली. मात्र, कोरोनाकाळात भरती रखडल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडण्याऱ्या उमेदवारांना केवळ एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी तुषार देशमुख यांनी केली आहे. (Latest Marathi News)

विद्यार्थी प्रतिनिधी तुषार देशमुख यांचं म्हणणं काय?

विद्यार्थी प्रतिनिधी तुषार देशमुख म्हणाले, 'राज्यात गृहविभागाने 7 हजार 471 पोलीस शिपाई पदांच्या जागांची भरती जाहीर केली. या भरतीआधी अनेक उमेदवारांचं वय उलटून गेलं आहे. मागील काळात २०२३ च्या शासन आदेशाची वैधता दिनांक 31 मार्चपर्यंत वाढवली, तर उमेदवारांना प्रयत्नासाठी एक संधी मिळेल. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील उमेदवारांच्या वतीने आम्ही नांदेड येथे जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महामोर्चे काढले. राज्यातील प्रत्येक आमदारांना निवेदन सादर केले'.

'हिवाळी अधिवेशनात आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही वेळात वय वाढ संदर्भात विधिमंडळाच्या सदस्यांकडून मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्या जात आहे. मार्च 2023 मध्ये या भरतीसाठी दोन वर्षे कमाल वयोमर्यादा वाढविण्यात आली. त्यानुसार डिसेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून पोलीस भरतीसाठी अर्ज घेणे अपेक्षित होते, असं तुषार देशमुख म्हणाले.

तुषार देशमुख यांच्या प्रमुख मागण्या काय?

तीन मार्च 2023 च्या शासन प्रशासनाच्या जीआरनुसार दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरती करणे, त्यानुसार ही भरती करण्यात आली नाही. ही भरती सन 2022-23 साठी आहे. त्यात वय गणना 2021-22 आणि 23 या वर्षातील करावी. तसेच 2021-22-23 या वर्षात वयोमर्यादा ओलांडण्याऱ्या उमेदवारांना केवळ एक संधी द्यावी, अशी मागणी तुषार देशमुख यांची आहे.

तुषार देशमुख यांच्या इतर मागण्या काय?

2019 पासून बँड पथक आणि कारागृह पोलीस भरती झाली नाही. 2024 मध्ये छत्तीसगड राज्य सरकारने पाच वर्षे राजस्थान सरकारने चार वर्षे तर उत्तर प्रदेश आणि केंद्रीय बोर्डाने तीन वर्षे वय वाढून दिले. त्याप्रमाणे राज्यात 31 मार्च 2024 पर्यंत वय वाढवून देणे का शक्य नाही, असा सवाल तुषार देशमुख यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा

Gauri Nalawade: माळरानी यावं गुलाबाचं फूल, गौरीच्या रुपाची पडली भूल!

Navi Mumbai Crime News: कंत्राटदाराने केली सहकाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Relationship Tips : डेट करणाऱ्या मुलीशी चॅटवर बोलताना 'ही' काळजी घ्या; प्रेमाचं नातं आणखी बहरेल

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ट्राय करा 'हे' Home Remedies

SCROLL FOR NEXT