Siddhi Hande
अभिनेत्री मृणाल ठाकूर ही खूप लोकप्रिय आहे. फक्त भारतात नव्हे तर जगभरात तिने नाव कमावले आहे.
मृणाल ठाकूर ही हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
मृणाल ठाकूरला सर्वाधिक लोकप्रियता ही कुमकुम भाग्य या मालिकेतून मिळाली होती.
मृणालने या मालिकेत बुलबुल पात्र साकारलं होतं. सहाय्यक कलाकार म्हणून तिला खूप ओळखलं गेलं.
परंतु कुमकुम भाग्य ही मृणालची पहिली मालिका नव्हती.
मृणाल ठाकूरने मुझसे कुछ कहती ये खामोशियां या मालिकेतून पदार्पण केले.
मृणाल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती.
यानंतर मृणालची करिअरमध्ये खूप प्रगती झाली. तिने बॉलिवूड आणि नंतर टॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
मृणाल अभिनयासोबतच आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना भूरळ पाडत असते.