- अवसायनात गेलेल्या संस्थेकडून नाफेडची कांदा खरेदी
- अवसायनात गेलेल्या बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेकडून नाफेडची कांदा खरेदी
- जिल्हा उपनिबंधकांकडून नाफेडला नोटीस, तातडीनं कांदा खरेदी थांबवण्याचे निर्देश
- दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील नाफेडच्या कांदा खरेदी अनियमितता?
- तर सिन्नर तालुक्यात २ केंद्रांवर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाचे छापे
- प्रत्यक्ष खरेदी केलेला कांदा आणि चाळीत साठवलेल्या कांद्यात तफावत आढळली
- कांदा खरेदीत त्रुटी आढळल्याने नाफेडची कांदा खरेदी पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात
भारतीय डाक विभागाची सेवा आता जलद गतीने होणार असल्याने खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.. बुलढाणा डाक विभागाच्या मुख्य कार्यालयामध्ये आज APT 2.0 अर्थात ॲडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजीचा शुभारंभ अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या हस्ते पार पडला.. APT 2.0 प्रणाली ही भारतीय डाक विभागाची आधुनिक डिजिटल प्रणाली आहे, या प्रणालीमुळे भारतीय डाक विभागाला आता जलद सेवा देता येणार आहे..
गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे, चिखली तालुक्यातील काही धरबे गाव तलाव जेमतेम भरले आहेत , पेन टाकळी ओहरफ्लो झाले आहे अश्या अवस्थेत तालुक्यातील सावरखेड हे गाव पेनटाकळी धरण नजिक आहे मात्र गेल्या 6 महिन्यापासून मानवी संकटामुळे गावाला पाणी पुरवठा केल्या जात नसल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लगत असल्याचे चित्र समोर आले आहे... पाणी पट्टी कर भरला असून घर पट्टी कर काही जणांचे राहिले असल्या कारणाने सरपंच व ग्रामसेवकाने पाणी पुरवठा बंद केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.. अश्या मुजोर ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहे.. 1000 लोकवस्ती असलेल्या सावरखेड गावात नादुरस्त हातपंप आहे त्याला पाणी नाही, त्यामुळे कुठेतरी दूरवरील विहिरीचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लगत आहे.. तातडीने जिल्हा प्रशासनाने लक्ष देत ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा अशी मागणी सावरखेड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे..
जालना जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य मिळवणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून धान्य मिळणार नाही. शासनाने यासंदर्भात कडक पावले उचलले असून सप्टेंबर महिन्यापासून केवळ केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. जालना जिल्ह्यामध्ये अद्यापही जवळपास 3 लाख 54 हजार 887 लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अन्नधान्य सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी करावी असं आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.
मनसेच्या बाळा नांदगावकरांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता...
तेव्हा दोन आक्टोंबर च्या मोर्चा संदर्भात शेतीच्या प्रश्नांवर भेटण्याचं बोलणं झालं होतं
आता योगायोगाने सहा तारखेला मी मुंबईत आहे त्यामुळे राज ठाकरेंसोबत भेट होईल
राजकारण हा वेगळा विषय आहे आणि भेटीगाठी हा वेगळा विषय आहे
अगामी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा कलम ६६ क नुसार तीन महिने कारावासाची शिक्षा आणि विनापरवानगी जमा केलेल्या रकमेच्या दीडपट दंडाची तरतूद आहे.
ज्या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे कायमस्वरूपी नोंदणी केली आहे, त्यांना वेगळ्या परवानगी आवश्यकता नाही.
मात्र, सर्व आर्थिक वर्षांची हिशोबपत्रके ऑनलाइन दाखल करणे बंधनकारक आहे.
नोंदणीकृत नसलेली मंडळे आणि संस्थांनी ट्रस्ट कायद्याच्या कलम ४१ क अन्वये वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.
आरोपी वाल्मीक कराड ने आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी नसल्याचा अर्ज बीड विशेष न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता वाल्मिक कराडने आता वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोष मुक्तीच्या अर्ज संदर्भात आणि दोषारोप पत्रासंदर्भात उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्याची माहिती साम टीव्ही ला सूत्रांनी दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली जाईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केली आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाज मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री शिरसाठ यांच्या झाले. यावेळी त्यांनी होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी निधीची घोषणा केली. यावेळी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.
अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत आपण गप्प बसायचं नाही,असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे, जी युती मध्ये असून देखील छत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही,असं मत देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने आयोजित युवा संवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
कराडच्या प्रीतीसंगम परिसरात कृष्णा- कोयना नदीच्या काठी मगरीचे वास्तव्य असून ड्रोनमधून हालचाल टिपण्यात आली आहे. मगरीच्या या वास्तव्यामुळे नागरिकांच्यात तसेच पोहायला जाणाऱ्या लोकांच्यात मोठे भीतीचे वातावरण आहे. आज ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या चित्रीकरणात मगरीचे स्पष्ट दृश्य टिपले गेले असून, या दृष्यांनी परिसरात खळबळ उडाली आहे.
कोयना व कृष्णा नदीच्या संगमावर असलेल्या प्रीतीसंगमाला दररोज शेकडो पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात. ड्रोन चित्रीकरणात मगर नदीत शांतपणे तरंगताना व एका जागी स्थिरावलेली दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.