संजय राठोड, यवतमाळ
यवतमाळमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या वर्धा नदीत तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. नदीपात्रात बुडालेल्या मृतक मुलांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या वर्धा नदीत तीन मुलं बुडाली आहेत. वर्धा नदीत बुडालेल्या मुलांचा शोध सुरु आहे. वर्धा नदीपात्रात बुडालेल्या मृतक मुलांचा शोध सुरु आहे. वणीच्या विठ्ठलवाडी येथील तिघांचा सामावेश आहे. वणी ते वरोरा मार्गावर असलेल्या वर्धा नदीत तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या पाटाळा येथील घटना आहे.
वर्धा नदीत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन, महसूल कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आहेत. संकेत नगराळे , अनिरुद्धव चापले, हर्ष चापले असे मृत विद्यार्थ्यांचे नावे आहेत. सर्व मृत विद्यार्थी विठ्ठलवाडी येथील राहणारे आहेत.
या घटनेनंतर स्थानिकांनी वणीचे तहसीलदार, माजरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर स्वत: डीओ ऑफिसर आणि पोलीस स्टाफसह घटनास्थळी भेट देऊन संयुक्त शोध मोहीम सुरु केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कारने पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळली. त्यानंतर कारने पेट घेतल्याने आगीत होरपळून कारचालकाचा मृत्यू झाला. 35 वर्षीय दीपक चरण बघेल असे मृतकाचं नाव आहे. मृतक हा CISF जामनगर गुजरात येथे कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता.
CISF जवान हा काही कामासाठी नागपूरला गेला होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ते पुलाच्या कठड्याला धडक देत वाहनासहित खाली कोसळले. दीपकने वाहनातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाहेर पडू शकला नाही. कारने लगेच पेट घेतला. यामध्ये दीपकचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.