Dog Attack Saam tv
महाराष्ट्र

Shocking News : दिवाळीत दु:खाचा डोंगर, ४ वर्षाच्या लेकीच्या मृत्यूने आईने टाहो फोडला, जालन्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस

Jalna News : जालना शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Alisha Khedekar

जालना शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे

अंबड चौफुली परिसरात घडली हृदयद्रावक घटना

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे

नागरिकांनी भटक्या कुत्र्यांवर तात्काळ उपाययोजनांची मागणी केली

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

जालन्यातून धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका चार वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या हल्ल्यात चिमुकलीचा जागीच जीव गेला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा सविस्तर तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातील यशवंत परिसरात घडली आहे. मृत चिमुकली सकाळी घराबाहेर पडली होती. या दरम्यान रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

दरम्यान चिमुकलीच्या अंगावरती भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं पोलिसांनी म्हटल आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तसेच तपास पूर्ण झाल्यावरच निश्चित या चिमुकलीचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर चिमुकलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला असून पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिकांनी भटक्या कुत्र्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका लॉटरीमुळे भाजपची झोप उडणार? 'मुंबई'चा महापौर 'ठाकरे'च होणार?

ट्रम्पनं ब्रिटनला फटकारलं? 'दिएगो गार्सिया' बेटावर अमेरिकेचा दावा

मुंब्र्याचा रंग हिरवा करणार, MIM नगरसेविकेचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप-शिंदेसेनेत संघर्ष पेटला? सरवणकरांचा आरोप, व्हॉटसअ‍ॅप मेसेजमुळे पराभव

ठरलं! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महौपार; मुंबईचं काय?

SCROLL FOR NEXT