kalyan Street Dog Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Street Dogs : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी ३५ जणांना घेतला चावा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

kalyan Street Dog Bite : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळतेय. कल्याणमध्ये एकाच दिवशी ३५ जणांना घेतलाय.

Vishal Gangurde

कल्याणमध्ये एका दिवसात ३५ लोकांना भटक्या कुत्र्याने चावा

वल्ल पीर रोड परिसरात एकाच कुत्र्याने सलग पाच जणांवर हल्ला

जखमींवर रुक्मिणीबाई रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : कल्याणमध्ये पुन्हा भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. कल्याणमध्ये एकाच दिवशी ३५ जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुत्र्याने चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

कल्याणमध्ये एकाच दिवशी तब्बल ३५ जणांना चावा घेतलाय. हे नागरिक रुक्मिणीबाई रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराधीन आहेत. वल्ल पीर रोडवर एका कुत्र्याने तर सलग पाच जणांना चावा घेतला आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

कुत्र्याने चावा घेतलेल्या मोहसीन सय्यद यांनी सांगितलं की, 'मी घरात जेवण केलं. त्यानंतर इमारतीच्या खाली पार्क केलेल्या बाईकवर बसलो. त्यानंतर बाईक सुरु करायला घेतली, तितक्यात एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. मी कुत्र्यावर ओरडलो. त्यानंतर कुत्र्याने तिथून पळ काढला. माझ्या परिसरातील या भटक्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतला आहे. या कुत्र्याने लहान मुलांनाही चावा घेतला आहे. माझ्या बाजूला असलेल्या रुग्णाला देखील कुत्र्याने चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्याच्या चाव्याने एखादा लहान मुलगा मृत्यूही होण्याची शक्यता आहे'.

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. एका दिवशी तब्बल 35 नागरिकांना कुत्र्यांची चावा घेतल्याची घटना घडली. काही जखमींवर कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

विशेष म्हणजे कल्याण पश्चिमेतील वल्ल पीर रोड परिसरात एका कुत्र्याने सलग पाच जणांना चावलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर नागरिकांन रात्री-सकाळी रस्त्यावर फिरणं अवघड झालंय. लोक प्रशासनाकडे धाव घेत आहेत. कल्याणकरांनी मनपाकडे आणि स्थानिक प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तातडीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT