बालशौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या युवकाची उदरनिर्वाहासाठी धडपड  संतोष जोशी
महाराष्ट्र

बालशौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या युवकाची उदरनिर्वाहासाठी धडपड

मोलमजुरी करुन भरावी लागते पोटाची खळगी

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : राष्ट्रपती President, पंतप्रधानांच्या Prime Minister हस्ते बालशौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या, युवकाची सरकारच्या government दुर्लक्षामुळे मोठी फरफट होते आहे. त्याच्यावर मजूरीचे काम करण्याची वेळ आली आहे. नांदेड Nanded जिल्ह्यामधील अर्धापूर Ardhapur तालुक्यातील पार्डी Pardi येथील या युवकाची ही कहाणी आहे..

२०१८ मध्ये नदीत बुडणाऱ्या २ मुलींचा जिव वाचविणाऱ्या अर्धापूर तालुक्यामधील पार्डी येथील एजाज नदाफ याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद Ramnath Kovindआणि पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी बालशौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. मात्र, या बालशौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्या, एजाज नदाफ वर केळीच्या गाड्या भरण्याचे काम करावे लागत आहे.

हे देखील पहा-

१२वी ला परिक्षा फी भरण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे एजाजचे संपूर्ण वर्षे वाया गेले आहे. मात्र, खचून न जाता एजाजने बारावीची परिक्षा देऊन 82 टक्के गुण मिळविले आहे. शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह हे २ प्रश्न भेडसावत असल्याने एजाज नदाफ याला मजूरी करावी लागत आहे. बालशौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या, एजाज नदाफचे देश, राज्य आणि स्थानिक पातळीवर सत्कार करण्यात आला होता. मात्र, एजाजच्या मुलभूत सुविधा किंवा त्याला नोकरी देणे तर सोडाच त्याला साधे घरकुल ही मिळाले नाही.

एजाज नदाफने जिवाची पर्वा न करता माणूसकीतून २ मुलींचा जिव वाचविला होता. यानंतर त्याचे बालशौर्य पुरस्कार मिळाला आहे, आणि देशभरातुन कौतुक झाले आहे. नंतर मात्र, एजाज नदाफकडे कोणीच लक्ष दिले नाही. एजाज ची परिस्थितीकडे केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष देऊन, त्याला शासकीय नोकरीत सामावून घेतले, तरचं एजाजचा खराखुरा सन्मान होईल अशी भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Symptoms: सकाळी उशीवरच दिसतील कॅन्सरची लक्षणे, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

निवडणुकीपूर्वी भंयकर घडलं; बड्या नेत्यासह पत्नी अन् मुलीचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: समिती कसला अभ्यास करणार? कर्जमाफीवरून ठाकरे आक्रमक

Gold Rate : ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त, चांदीचा भावही घसरला; वाचा २२ कॅरेट-२४ कॅरेटचे आजचे दर

Electricity Bill: वीज बिलात ऐतिहासिक कपात, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या किती फायदा होणार?

SCROLL FOR NEXT