नगरवरुन श्रीरामपुरकडे जाणाऱ्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक Saam TV
महाराष्ट्र

नगरवरुन श्रीरामपुरकडे जाणाऱ्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक

विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

सचिन अगरवाल

नगर : शेवगावमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला होता. शुक्रवारी पैठण, शनिवारी सकाळी अहमदनगर व श्रीरामपुर कडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसेसवर अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आली असून या प्रकारामुळे कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. मात्र, शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही. शेवगावकडून अहमदनगरकडे जाणारी बस वर अज्ञात इसमाने अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली आहे. श्रीरामपुर कडे जाणारी बस वर सौंदळा ( भेंडा नेवासा), तसेच पैठणकडे जाणाऱ्या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे.

दरम्यान राज्यात एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असून आज शहापूर बस आगरातून पहिली बस शहापूर - किन्हवली साठी धावली आहे. शहापूर बस स्थानकातून पहिली बस किन्हवलीच्या दिशेने प्रवाशी घेऊन निघाली व एक फेरी देखील पुर्ण केली. आज सकाळी 7 वाजता शहापूर आगरातून पहीली बस घेऊन वाहक - शंकर शेरे व चालक - अशोक डोंगरे यांनी पहीली बस सेवा सुरु केली असून शहापूर ते किन्हवली पहिली फेरी पूर्ण करण्यात आली आहे. शहापूर बस वाहतूक नियंत्रण महेश परटोले ,डेपो मेनेजर, मेकेनिकल, कॅशियर जवळपास 15 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 20 दिवस संप सुरू आहे. दिवसभरात 3 फेऱ्या मारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT