Gautami Patil  Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil in Ahmednagar : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान दगडफेक, हुल्लडबाजांच्या राड्यानंतर कार्यक्रम अर्ध्यावरच थांबवला

Gautami Patil News : अहमदनगरमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात दगडफेकीची घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News : डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की तरुणाईची गर्दी होणार हे नक्की. मात्र गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान बेभान झालेल्या तरुणांमुळे अनेकदा गोंधळ झाल्याचं दिसून आलं आहे. आता अहमदनगरमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात दगडफेकीची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. गौतमीचा कार्यक्रम म्हणून मोठ्या संख्येने तरुणांनी येथे उपस्थिती लावली होती. (Entertainment News)

गौतमीचा कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र चोख सुरक्षाव्यवस्था नसल्याने गोंधळ वाढत गेला आणि तेथे दगडफेक झाली. हुल्लडबाजांच्या या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलीस आणि खाजगी बाउन्सर समोर हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला.

या सगळ्या गोंधळानंतर गौतमी पाटीलला  डान्सचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम घेणार नसल्याचा इशाराच गौतमीने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT