Chandrakant Patil/ Shivsena Saam TV
महाराष्ट्र

...त्यामुळे कोल्हापूरात मतदान करण्याबाबातचा योग्य आदेश 'मातोश्री'वरून येईल - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर मधला सेनेचा हिंदुत्ववादी मतदार हातावर शिक्का मारण्याची सवय झाली तर यो परत येणार नाही.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूर मधला सेनेचा (Shivsena) हिंदुत्ववादी मतदार हातावर शिक्का मारण्याची सवय झाली तर यो परत येणार नाही. हे लक्षात आलं तर मातोश्रीवरून योग्य आदेश येईल. असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. ते आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा भाजपाचा जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ, धनंजय महाडिक, माधव भंडारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, 'कोल्हापूर उत्तरची पोट निवडणूक (Kolhapur North By-Election) जिंकल्यानंतर विमानतळाचा आढावा घेतला जाईल. या विमानतळावर मोठी विमान उतरल्याशिवाय जिल्ह्याची उद्योगिक प्रगती होणार नाही. विमानांने शेती माल पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

सेनेचा हिंदुत्ववादी मतदाराला हातावर शिक्का मारण्याची सवय झाली तर...

हे देखील पहा -

ते पुढं म्हणाले, 'शाहू जन्मस्थळाच सगळं काम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहेत. हे तुमच्या माहितीसाठी बंटी पाटलांना कधी कुटुंब कळलंच नाही. भाजप एक कुटुंब आहे इथं एखाद्याच्यात लग्न ठरलं की आम्ही जातो ही निवडणूक म्हणजे एक लग्नच आहे.' असा टोला त्यांनी सतेज पाटलांना लगावला.

तसंच कोल्हापूर मधला सेनेचा हिंदुत्ववादी मतदार हातावर शिक्का मारण्याची सवय झाली तर यो परत येणार नाही. हे लक्षात आलं तर मातोश्रीवरून योग्य आदेश येईल. 2014 ते 2019 मध्ये आमचं सरकार पाडण्याचा तीन वेळा प्रयोग झाला असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT