Artificial Rain Saam Ta
महाराष्ट्र

Artificial Rain in Maharashtra : राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचालींना वेग, गुलाबराव पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

Artificial Rain News : शास्त्रज्ञांशी चर्चा देखील सुरु करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News :

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकार कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरण असल्यास पाऊस पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शास्त्रज्ञांशी चर्चा देखील सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून याबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. पिकांचं फार मोठं नुकसान झालं आहे.   दुष्काळसदृष परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे पाणीटंचाईची फार मोठी समस्या उभी राहू शकते. आता कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होऊ लागली आहे. शास्त्रज्ञांशी याबाबत चर्चा सुरु आहे. पोषक वातावरण असेल तर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम तयार केलं जाणार आहे. सातव्या मजल्यावरील CM वॅार रुममधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

सरासरीपेक्षा कमी पाऊस

या भागांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना सरकारकडून केल्या जाणार आहेत. राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naagin 7 : मौनी रॉय, तेजस्वी प्रकाशनंतर कोण बनली 'नागिन'? चेहरा आला समोर, पाहा VIDEO

Liver Damage Tea: गरमागरम चहाने दिवसाची सुरुवात करताय? लिव्हरवर होईल गंभीर परिणाम, संशोधनातून माहिती समोर

Pune : पुरंदरमध्ये जमिनी विकत आहात? त्याआधी वाचा PMRD चा कडक इशारा , नेमकं काय आहे प्रकरण?

Shocking: हात-पाय बांधले, कुकरच्या झाकणाने गतिमंद विद्यार्थ्याला बेदम मारहाण; संभाजीनगरात धक्कादायक प्रकार; VIDEO व्हायरल

ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT