Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg saam tv
महाराष्ट्र

इलेक्ट्रिक वाहनांची टोलमाफी फक्त कागदावरच? GR काढूनही समृद्धीवर टोल वसुली सुरूच

toll exemption for EVs but enforcement still pending : राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीचा आदेश दिला, मात्र अंमलबजावणी होईपर्यंत विलंब झाला आहे. टोल नाक्यावर वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे

Toll Exemption for EVs Approved But Yet to Be Enforced on Major Highways : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने २३ मे रोजी शासन आदेश काढला होता. राज्यातील समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे या महामार्गावर सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शंभर टक्के टोल माफीचा निर्णय घेतला होता. ३० दिवसांच्या आत संबंधित विभागाने यावर नियमावली करून अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. मात्र ३० दिवसांचा कालावधी उलटला तरी त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

शासन आदेश निघाल्यानंतर इलेक्ट्रिक वाहन चालक समृद्धी महामार्गावर प्रवास करत आहेत. मात्र टोल नाक्यावर सूट दिली जातनाही. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असते वाद घातला जात आहे. टोल नाक्यावरील कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये हुज्जत होत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. शासनाची इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी फक्त कागदावरच आहे का? असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

शासन आदेशानंतर अनेक इलेक्ट्रिक वाहनचालक समृद्धी महामार्गावर टोलमाफीच्या अपेक्षेने प्रवास करत आहेत. परंतु, टोल नाक्यांवर त्यांना कोणतीही सूट मिळत नाही. टोल कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यास वाद निर्माण होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. वाहनचालक आणि कर्मचारी यांच्यात हुज्जत होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शासनाचा टोलमाफीचा निर्णय केवळ कागदावरच राहिल्याची टीका वाहनचालकांकडून होत आहे.

"शासनाने मोठी घोषणा केली, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. टोल नाक्यावर कर्मचारी आदेशाबाबत अनभिज्ञ असतात," असे एका इलेक्ट्रिक वाहनचालकाने सांगितले. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोत्साहनासाठी घेतलेला निर्णय प्रभावी ठरण्यास अडथळे येत आहेत. संबंधित विभागाने तातडीने नियमावली तयार करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. अन्यथा, हा निर्णय फक्त घोषणाबाजी ठरेल, असा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT