MHADA Saam TV
महाराष्ट्र

MHADA Lottery: म्हाडाची घरे घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; म्हाडानं लॉटरी प्रक्रियेत केले बदल

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया हाताळली जाणार आहे, स्वयंचलित ब्लॉकचेन प्रणालीमध्ये नागरिकांकडून डिजिटल स्वरूपात सादर करण्यात आलेली माहिती व कागदपत्रे कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सोडत प्रक्रिया आता पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहीत करण्यात आली आहे.

त्यामुळे सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी दिली.   (Latest Marathi News)

म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता IHLMS 2.0 (Integrated Housing ottery Management System) ही नूतन संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया हाताळली जाणार आहे, स्वयंचलित ब्लॉकचेन प्रणालीमध्ये नागरिकांकडून डिजिटल स्वरूपात सादर करण्यात आलेली माहिती व कागदपत्रे कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत. तसेच ही प्रणाली वेळोवेळी स्वयंचलित अद्ययावत होणार आहे.

नागरिकांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे.  नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदारास एक युनिक क्रमांक प्राप्त होणार आहे व याआधारे अर्जदाराचे स्वतंत्र कायमस्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे, असे डिग्गीकर यांनी सांगितले. 

नवीन संगणकीय सोडत प्रणाली म्हाडासाठीच नव्हे तर नागरिकांसाठी देखील एक पर्वणी ठरणार आहे कारण अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी या प्रणालीद्वारे त्वरित होणार आहे.प्रचलित सोडत प्रणालीमध्ये सोडतीत यशस्वी झाल्यानंतर अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जात होती. परंतु, नवीन प्रणालीमध्ये नोंदणीकरण प्रक्रिये दरम्यान म्हाडाने चेकलिस्टनुसार निर्धारित केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार म्हाडाच्या सदनिका विक्री सोडत प्रक्रियेतील पात्र उमेदवार ठरतील. अशाप्रकारे अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील.          

म्हाडातर्फे अर्जदारांना नवीन प्रणालीबाबत माहिती व मार्गदर्शन मिळण्याकरिता लवकरच  मदत कक्ष (Helpline Centre) सुरू करण्यात येणार असून अर्जदारांनी मदत कक्षाच्या ०२२ ६९४६८१०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT