DA HIKE Saam Tv
महाराष्ट्र

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ, पगार किती वाढणार? चेक करा

महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकीसह जानेवारी २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण महागाई भत्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांवर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शासन आदेशानुसार १ जुलै २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्यात येणार आहे. महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकीसह जानेवारी २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

कर्मचाऱ्यांना सध्या ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. पण जानेवारी महिन्याच्या पगारापासून त्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. ४ टक्के महागाई भत्ता वाढल्यानंतर आता १८००० रुपयांच्या मूळ वेतनावरील पगारात वार्षिक वाढ ६८४० रुपये होईल.

महागाई भत्ता कॅल्क्युलेशन पाहा

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन असेल तर १८००० असेल तर त्याला सध्याच्या ३४ टक्के महागाई भत्त्यानुसार ६१२० प्रति महिना मिळत असेल. मात्र नवीन महागाई भत्ता ३८ टक्के लागू झाल्यानंतर ही रक्कम ६८४० प्रति महिना होईल. याचा अर्थ दरमहिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२० रुपये वाढतील. यानुसार वार्षिक पगारातील वाढ ८६४० रुपये असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYC मध्ये चूक! लाडकीची यादी अंगणवाडी सेविकांकडे पोहचली, आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी

Shipi Amti Recipe : कर्जतची स्पेशल झणझणीत शिपी आमटी; भाताची चव वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

हृदयद्रावक! स्कूल बसने आजी-नातीला चिरडले, कुशीतील ९ महिन्याचे बाळ चाकाखाली, मुंबईतील मन हेलावणारा VIDEO

Dowry Harassment: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'ची आत्महत्या; हुंडाबळीचा फास कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT