Manoj jarange patil saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: सरकारच्या शिष्टमंडळाशी उद्या शेवटची चर्चा अन् शेवटचा तोडगा: मनोज जरांगे-पाटील

Maratha Reservation : उद्या मनोज जरांगे-पाटील सरकारच्या शिष्टमंडळाशी शेवटची चर्चा करणार आहेत.

Bharat Jadhav

Manoj Jarange-Patil:

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी आपण उद्या शेवटची चर्चा करणार असल्याची माहिती मनोज जरांगे-पाटील यांनी दिलीय. (Latest News)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत सरकार आरक्षण देण्यास सर्व पक्ष सहमत आहेत. परंतु मनोज जरांगे-पाटील यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी सरकारला वेळ द्यावा, अशी मागणी केली. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहेत. राज्यातील काही ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. यानंतर सरकार अॅक्शन मोडवर आले असून हिंसक आंदोलन करणाऱ्यावर पोलीस कारवाई केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकाराच्या या निर्णयावर मनोज जरांगे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. सरकारने आंदोलनस्थळी चर्चा करावी असं मागणी केली होती. परंतु या बैठकीत आरक्षणावरू पूर्ण तोडगा निघाला नाही. याचदरम्यान आठ दिवसांपासून आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे-पाटील यांनी सरकारला चर्चा करण्याची शेवटची संधी दिलीय. यापार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास पुन्हा आपली भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी सरकारला दीड तासांचा वेळ दिला. अन्यथा रात्री ९ नंतर आपण पाणी देखील घेणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरकारने निरोप पाठवत उद्या सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याची माहिती खुद्द जरांगे पाटील यांनी दिली. यावर आपलं मत मांडताना मनोज जरांगे पाटील यांनी ही शेवटची चर्चा आणि शेवटचा तोडगा असेल असं म्हटलंय.

सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्ते जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. उद्या होणारी चर्चा ही शेवटची असेल आणि तोडगाही शेवटचा असेल, अशी माहिती जरांगे-पाटील यांनी दिलीय. चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही असं सरकारकडून सांगण्यात येत. मग चर्चा या, परंतु ही चर्चा शेवटची असेल , असं आपण सरकारला सांगितल्याचं जरांगे-पाटील म्हणालेत.

राज्यातील सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी राजकीय नेतेमंडळींना चर्चा करण्यासाठी आवाहन केलं होतं. 'तुम्ही इथे चर्चा करायला या. सांगा कसं आणि कधी आरक्षण देतात, होऊ द्या दूध का दूध.. पानी का पानी. महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार का? ते इथे येऊन बोलावं. आम्हला कळू द्या, त्यांच्या मनात काय आहे? इथे या..आम्ही चार दिवसांपासून म्हणतोय, इथे या... बोलावलं तरी येत नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण, व्यवहाराची स्वतंत्र विभागनिहाय तपासणी होणार

वा रे लखन वा! डबल हिंद केसरी लखन बैलानं जिंकली फॉर्च्युनर आणि चांदीची गदा

एकनाथ शिंदेंनी केली संजय राऊतांच्या तब्येतीबाबत विचारपूस; काय झालं नेमकं बोलणं? VIDEO

Delhi Blast: 'जैश'च्या महिला विंगची चीफ निघाली डॉ. शाहीन, कारमध्ये ठेवायची AK-47, दिल्ली स्फोटापूर्वी अटक

Gkowing Skin Face Wash: ग्लोईंग स्किनसाठी सामान्य फेसवॉश नाही; २% सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेले फेसवॉश आहेत बेस्ट

SCROLL FOR NEXT