Sunil Shukre  Saam Tv
महाराष्ट्र

State Commission of Backward Class : राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना; सुनील शुक्रे बनले नवे अध्यक्ष

Backward Classes Commission Members : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारकडून शुक्रे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. सुनील शुक्रे यांनी गेली १० वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. यावर्षी २४ ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झालेत.

Bharat Jadhav

Sunil Shukre State Commission of Backward Class president :

गेल्या काही दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सत्र चालू होतं. अध्यक्षांसह अनेक सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आयोगाची पुनर्रचना करण्यात आलीय. आयोगाचे नवे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आलीय. सुनील शुक्रे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. राज्य मागासवर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष आणि 3 नव्या सदस्यांच्या नियुक्तीचा आदेश देण्यात आले आहेत. (Latest News)

राज्य मागासवर्गाच्या आयोगाच्या (State Backward Classes Commission) अध्यक्षस्थानी (President) सुनील शुक्रे असतील. तर सदस्यपदी ओमप्रकाश जाधव, मारुती शिकारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आलीय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मागासवर्ग आयोगात राजीनामा सत्र चालू होतं. त्यामुळे आयोग बरखास्त होण्याची वेळी आली होती. पण मराठा आरक्षणासाठीचं (Maratha Reservation) काम या मागासवर्ग आयोगाला करायचे असल्याने तातडीने आयोगाची पुनर्रचना करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. अशोक निरगुडे यांनी राजीनामा (Resignation) आज दिला. त्यांच्याआधी तीन सदस्यांनी आपले राजीनामे दिले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलीय. आनद वसंत निरगुडे यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी सुनील शुक्रे यांची निवड करण्यात आली. सुनील शुक्रे यांनी गेली १० वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. ते यावर्षी २४ ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झालेत. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यावे आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जे निवृत्त न्यायाधीश गेले होते त्यात शुक्रे यांचा समावेश होता.

दरम्यान या आयोगातील सदस्यांनी सरकारवर हस्तक्षेपाचा आरोप केला होता.मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यासह अॅड. बालाजी किल्लारीकर, प्रा. लक्ष्मण हाके, प्रा. संजीव सोनावणे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. राजीनामा देतांना त्यांनी सरकारवर आरोप केलेत. सरकार मागासवर्ग आयोगाला गृहीत धरत होतं. आमच्या अधिकारात सरकारचा हस्तक्षेप होत आहे. शासन त्यांचे निर्णय आणि सूचना आमच्यावर लादत होते. असा आरोप किल्लारीकर यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT