Dhananjay Munde Saam Tv News
महाराष्ट्र

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मंजूर झालेली २० वसतिगृहे तात्काळ सुरू करा - धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

रश्मी पुराणीक

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी साकारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत 2021 साली शासकीय वसतिगृह (Government Hostel) योजना सुरु करण्यात आली. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेली 20 वसतिगृहे तातडीने सुरू करा. तसेच ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी तेथे प्रवेश प्रक्रियाही सुरू करावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

जून 2021 मध्ये शासन निर्णय जारी करून संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 20 वसतीगृहांना मंजुरी देण्यात आली होती. तसेच भाड्याच्या जागेत सदर वसतिगृहे उभारण्यासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार इमारत अधिग्रहण व अन्य प्रक्रिया देखील समाज कल्याण विभागाने पूर्ण केलेली आहे.यांतर्गत बीड जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी 100 ची क्षमता असलेले 12 तर अहमदनगर व जालना जिल्ह्यात प्रत्येकी 4 असे एकूण 20 वसतिगृह मंजूर करण्यात आले आहेत.

ऊसतोडणी हंगाम संपल्याने सध्या ऊसतोड कामगार हे आपल्या गावीच असतात, मात्र मुला-मुलींच्या शाळेसाठी त्यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना ठेवणे, हे त्या कामगारांना परवडणारे नसते, त्यामुळे शिक्षणात खंड पडण्याची तसेच मुलींचे अल्प वयात लग्न लावून देण्याची भीती असते.यावर शिक्षण व त्याला पूरक सुविधा पुरवणे हाच दीर्घकालीन उपाय असून या उद्देशानेच संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आली होती,असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात या 20 वसतिगृहांना भाड्याच्या जागेत उभारण्यासाठी व अन्य पूरक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.सदर वसतिगृहाची इमारत अधिग्रहण आदी प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आलेली असून सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत,त्यामुळे मंजूर 20 ही वसतिगृहे सरकारने तात्काळ सुरू करावेत व ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना प्रवेश देणे सुरू करावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

Healthy Chapati : गव्हाची चपाची पौष्टीक करण्यासाठी खास टिप्स, मुलांच्या टिफीनसाठी खास रेसिपी

SCROLL FOR NEXT