Kolhapur To Mumbai Flight Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur To Mumbai Flight: घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरकरांसाठी गूड न्यूज; मुंबईपर्यंत दररोज विमानाने करता येणार प्रवास

Star Air Kolhapur To Mumbai: स्टार एअर कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Flight Schedule:

कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी आजपासून रोज विमानसेवा सुरु होत आहे. स्टार एअर कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे नेहमी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे. दरम्यान सेवेचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत होत असून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश मिळालं आहे. (Latest Marathi News)

कोल्हापुरातून या आधी कोल्हापूर- मुंबई विमानसेवा ही आठवड्यात मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार हे चार दिवस सुरु होती. मात्र कोल्हापूर व परिसरातून सध्या कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यां ची संख्या वाढत असल्याने आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे, एसटी व खासगी वाहनांना लागणारा वेळ पाहता कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानसेवा सुरु व्हावी अशी मागणी उद्योजक आणि व्यापारी वर्गातून होत होती.

ही मागणी लक्षात घेता खा. धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा करत ही सेवा दररोज सुरू व्हावी अशी मागणी लावून धरली होती आणि आता या मागणीला यश आले आहे. आजपासून कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू झाली असून आठवड्यातील सातही दिवस मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय झाली आहे.

दरम्यान स्टार एअरकडून विमान सेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही विमानसेवा बंगळुरु ते मुंबई व्हाया कोल्हापूर अशी असणार आहे. बंगळुरुहून सकाळी ९:०५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरसाठी निघेल आणि १०:२० मिनिटांनी ते कोल्हापुरात पोहचेल.

तर सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापुरातून हे विमान मुंबईसाठी उड्डाण करेल आणि मुंबईत ११:५० ला पोहचणार आहे. तसेच मुंबईतून दुपारी ३ :४० मिनिटांनी हे विमान कोल्हापुरसाठी निघेल आणि कोल्हापुरात ते ४:४० वाजता पोहचेल ५:१० मिनिटांनी ते बंगळुरुसाठी रवाना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electrolyte Drink: मधुमेही रुग्णांसाठी इलेक्ट्रोल पावडर योग्य आहे का? जाणून घ्या फायदे-तोटे

Sunday Horoscope : भाग्याला कलाटणी मिळणार, जुन्या गोष्टींमधून फायदा होणार; रविवार ५ राशींच्या लोकांसाठी गेमचेंजर ठरणार

Shatataraka Nakshatra : शततारका नक्षत्रात जन्मलेले लोकअसतात हुशार, धाडसी, पैसा आणि अधिकार मिळवणारे

Success Story: खिशात फक्त १२०० रुपये घेऊन मुंबईत आला, आज आहे ३०० कोटींचा मालक

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

SCROLL FOR NEXT