Beed ST Bus Saam TV
महाराष्ट्र

ST Bus : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार; एसटीच्या तिकीट दरात वाढ

ST Ticket Price Will Increase : दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Ruchika Jadhav

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वचजण गावी जातात. आता तुम्ही देखील गावी जाण्याच्या तयारीत असाल आणि एसटीने प्रवास करायचा असेल तर तिकीटाचे जास्तीचे पैसे मोजावे लागतील. एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाने हा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवलाय. त्यास मंजुरी मिळाल्यास चाकरमान्यांच्या खिशावर याचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एसटी महामंडळाच्या महसुलात वाढ व्हावी यासाठी हंगामी भाडेवाढ दरवर्षी केली जाते. याच भाडेवाढीनुसार, उन्हाळी हंगामातील भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यंदाची भाडेवाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीपर्यंत लागू असेल.

एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वच शाळांना सुट्ट्या पडतात. सुट्टी असल्याने नागरिक देव दर्शन, ट्रिप, पिकनीक, गावी जाणे असे विविध प्लान करतात. अशात गावाकडे जायचे असल्यास अनेक नागरिक एसटी बसचा पर्याय निवडतात. एसटीचा प्रवास प्रत्येक सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडतो. मात्र आता तिकीच्या दरात १० टक्क्यांनी वाढ होणार असल्याने सामान्यांच्या खिशावर याचा भार येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT