ST Strike: एसटी विलीनीकरणाचा अहवाल दोन दिवसांत- अनिल परब Saam Tv
महाराष्ट्र

ST Strike: एसटी विलीनीकरणाचा अहवाल दोन दिवसांत- अनिल परब

एसटीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: राज्यामध्ये एसटी (ST) कर्मचाऱ्यांचा संप मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यामुळे एसटीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. न्यायालयाच्या (court) आदेशानुसार राज्य शासनाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. पुढील २ दिवसामध्ये समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. यानंतरच एसटीच्या विलीनीकरणाविषयी (Merger) पुढचे पाऊल उचलणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. (ST merger report in two days Anil Parab)

हे देखील पहा-

मालेगावी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री परब (Anil Parab) यांनी संवाद साधला आहे. परब यावेळी म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना संप मिटविण्याविषयी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने निर्णय होऊ शकलेला नाही. त्रिस्तरीय समितीचा अहवाल आल्यावर तो न्यायालयाला सादर केला जाणार आहे.

एसटी बंद ठेवून कर्मचाऱ्यांच्या मागण्या, हक्क मिळू शकणार नाही. एसटीचा संप नाहक लांबविण्यात आला आहे. त्यांना फितविणाऱ्यांमुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्रिस्तरीय समिती जो निर्णय देणार आहे, तो आम्ही मान्य करू. ज्यांना तो निर्णय मान्य नसणार आहे, त्यांनी अपिलात जावे, असे यावेळी अनिल परब यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT