बीड: एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; डेपो बंद केला नाही म्हणून उचलले पाऊल  विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; डेपो बंद केला नाही म्हणून उचलले पाऊल

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: राज्यातील अनेक डेपो बंद आहेत, मग आष्टीचाचं का सुरू ? हा डेपो देखील बंद करावा. असं सांगूनही न ऐकल्याने बस चालकाने विषारी कीटकनाशक प्राशन करून, आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बीडच्या कडा बसस्थानकावर काल घडली आहे. बाळू महादेव कदम (वय 35, रा.आष्टी) असं चालकाचे नाव असून त्याला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हे देखील पहा-

आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. काल ते आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस (MH 20,BL 2086) ही घेऊन ते निघाले होते.

यावेळी कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही वेळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी कीटकनाशक प्राशन केले. दरम्यान चालक कदम यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात येताच, सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, वाहतुक नियंत्रक आलिशा बागवान यांच्यासह अनेकांनी, त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान ऐन दिवाळीत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं एसटी कर्मचाऱ्यातील नैराश्य पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

SCROLL FOR NEXT