ST bus service suspended Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आंदोलन पुन्हा पेटलं, बीड-धाराशिवमध्ये एसटी बसेस फोडल्या; लालपरीची सेवा बंद

Maharashtra Breaking News: बीडमध्ये मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटल्याचा चित्र पाहायला मिळतंय. बीडच्या पाडळशिंगी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा एसटी बसेसला टार्गेट केलंय.

Satish Daud

Maratha Reservation Latest Update

राज्य सरकारने सगेसोगरे अध्यादेशाचा कायदा करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीडमध्ये मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटल्याचा चित्र पाहायला मिळतंय. बीडच्या पाडळशिंगी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा एसटी बसेसला टार्गेट केलंय. तर धाराशिवमध्येही अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. (Latest Crime News)

खबरदारी म्हणून महामंडळाने लालपरीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत एसटी बसेस सोडल्या जाणार नाहीत, असे बोर्ड बस स्थानकावर लावण्यात आले आहेत. धाराशिव बस स्थानकातून सुटणाऱ्या बस शुक्रवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत.

बीड बसस्थानकातून सुटणाऱ्या एसटी बसेसही शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या आहेत. लालपरीची चाके थांबल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होत आहेत. खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट देखील केली जात आहे.

अव्वाच्या-सव्वा भाडे आकरले जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. सरकारने मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढून हा विषय संपवावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. यामुळे आता या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सोडवण्यासाठी सरकार नेमकं काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT