SSC Result 2026 Saam Tv
महाराष्ट्र

SSC Result 2026: नशिबाची साथ! दहावीत हे ५ जण काठावर पास, सर्वच विषयात ३५ गुण; मार्कशीटची सर्वत्र चर्चा

SSC Result 2026 Students Scored 35 Marks: दहावीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. याउलट अनेक विद्यार्थ्यांना फक्त ३५ टक्के गुण मिळाले आहेत.

Siddhi Hande

दहावीचा निकाल जाहीर

दहावीच्या निकालात अनेकांना १०० टक्के गुण

पुण्यातील अनेक विद्यार्थी काठावर पास

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेचा निकाल काल लागला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेतर काही बहाद्दर असेही निघाले की जे काठावर पास झाले आहेत. एकीकडं पुणे शहराला "शिक्षणाचे माहेरघर" किंवा "विद्येचे माहेरघर" म्हणून ओळखले जाते. मात्र याचं पुण्यातून अनेक विद्यार्थ्यांनी सगळ्याच विषयात 35 पैकी 35 गुण घेऊन पास होण्याचा जणू पराक्रम केलाय.

आज राज्यतील या पठ्ठ्यांचं मोठं कौतुक होत आहेय. कारण त्यांनी तशी करामतच केली. या विद्यार्थ्यांनी चक्क दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात 35 गुण मिळवले. सर्वांचंच लक्ष स्वतःकडे वेधून घेतलेये. पुणे येथील अनेक विद्यार्थ्यांना दहावीत 35 पैकी 35 गुण मिळाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा होती. विशेष म्हणजे सर्वच विषयांमध्ये या विद्यार्थ्यांना 35 गुण मिळाल्याने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

ssc result

पुणे येथील अक्षय बाळासाहेब भालेराव, निकिता अमोल कुचेकर आणि सुशांत मच्छिंद्र रोंगटे या दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वच विषयात 35 पैकी 35 गुण मिळाले. अगदी काठावर हे विद्यार्थी पास झाले असून प्रत्येक विषयात 35 मार्क घेऊन पास होण्याचा जणू पराक्रम केलाय. त्यांच्या या काठावरच्या यशाचं सर्वत्र कौतुक आणि मोठी चर्चा होतंये. त्यांच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील श्रुती दिंगाबर भागानगारे हिला देखील सर्वच विषयात 35 गुण मिळाले.

राज्यातील शेकडो मुलांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. जवळपास १७९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडे अनेकांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

Sheeps Won Thar: ना मेंढरं विकली, ना व्यवसाय सोडला! मेंढरांसोबतच घरी आली रुबाबदार थार

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT