SSC And HSC Exam Saam Tv
महाराष्ट्र

10th SSC Result: दहावीचा निकाल जाहीर! नागपूर तळाशी, कोकणने परंपरा राखली; पाहा कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल लागला

Maharashtra Board SSC Result: आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. यावर्षीही कोकण विभागाने बाजी मारली आहे.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत दहावीच्या परिक्षेत कोणत्या विभागाने बाजी मारली हे जाहीर केलं. यंदा राज्यातील दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर, नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. कोकण विभागाचा ९८.८२ टक्के निकाल लागला तर, नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा निकाल खालील प्रमाणे

पुणे : ९४.८१ टक्के

नागपूर : ९०.७८ टक्के

औरंगाबाद : ९२.८२ टक्के

मुंबई : ९५.८४ टक्के

कोल्हापूर : ९६.८७ टक्के

अमरावती : ९२.९५टक्के

नाशिक : ९३.०४ टक्के

लातूर : ९२.७७ टक्के

कोकण : ९८.८२ टक्के

फेब्रुवारी - मार्च २०२५ला राज्यात दहावीची परीक्षा पार पडली होती. गेल्या काही दिवसांपासून अंदाज आणि संभाव्य तारखा समोर येत होत्या. मात्र, बोर्डाच्या अध्यक्षांनी १३ मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती दिली. आज ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचा किती टक्के निकाल लागला, याची माहिती दिली.

यंदा राज्यातील दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, कोकण विभागाचा सर्वाधिक तर, नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकण विभागाने आपली परंपरा राखली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के लागला आहे. तर, नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के कमी लागला आहे.

यंदाही मुलींचीच बाजी

दहावीच्या परिक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ इतके असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ इतकी आहे. म्हणजेच मुलांपेक्षा मुलींना ३.८३ टक्के जास्त मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

Helmet: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? कसं ओळखाल?

Maharashtra Live News Update : मेंढपाळ धनगर बांधवांना शिवसेनेची आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT