Hindustani Bhau- Studetnt Protest Saam TV
महाराष्ट्र

'हिंदुस्तानी भाऊ'नं पसरवली अफवा, राज्यात विद्यार्थी उतरले रस्त्यावर; पाहा Video

SSC-HSC Exam: 10 वी 12 वी ची परीक्षा रद्द करावी किंवा आनलाईन घ्यावी यासाठी सबंध महाराष्ट्रातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर (संजय डाफ)

राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार या अफवेने नागपूरात विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं. नागपूरातील मेडिकल चौक परिसरात अचानक विद्यार्थी एकत्र झाले आणि ऑफलाईन परीक्षे विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा 'हिंदुस्तानी भाऊ' नामक तरुणाने पसरली होती. या विरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनं केलं होतं. त्यामुळे विद्यार्थी एकत्र आले. (Hindustani Bhau Viral Video)

'वर्षभर आमचा ऑनलाईन अभ्यास झाला, आमची लिहण्याची सवय तुटली, त्यामुळं ऑनलाईन परीक्षा घेतली तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं, त्यामुळं एकतर परीक्षा रद्द करावी, किंवा ऑनलाईन परीक्षा घाव्या, अशी मागणी करत विद्यार्थी आक्रमक झाले होते. दरम्यान एका शहर बसच्या काचा ही विद्यार्थ्यांनी फोडल्या. मात्र, पोलिसांनी वेळीच येत विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि त्यांना परत पाठवलं.

औरंगाबाद

कोरोनाने वर्षभरापासून शाळा, महाविद्यालयं बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा लिहिण्याचा सराव राहिला नाही. अशा परिस्थितीमध्ये शासन विद्यार्थ्यांचा विचार न करता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या विचारात आहे. यामुळे या परीक्षा रद्द करण्यात याव्या किंवा, ऑनलाईन घ्याव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे.

उस्मानाबाद- कैलास चौधरी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्यातील येऊ घातलेला दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अन्यथा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी विध्यार्थ्यांना हिंदुस्तानी भाऊनी सोशल मीडियावर केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत उस्मानाबाद शहरातील दहावी बारावीचे विद्यार्थी जिजाऊ चौक बार्शी नाका येथे एकत्र येत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांच्या दबावानंतर विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांची टीम येताच विद्यार्थ्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला.

पुणे - अश्विनी जाधव केदारी

पुण्यातही विद्यार्थी सकाळीच आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. विद्यार्थ्यांचीही तिच मागणी होती की आम्ही वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला आम्हाला काही कळालं नाही. मग आम्ही ऑफलाईन परीक्षा कशी देणार. अनेक मुलांकडे तर ऑनलाईन अभ्साय करायला मोबाईल देखील नाही. मग त्यांचं कसं होणार असा सवालही विद्यार्थांनी विचारला आहे. त्यामुळे आता परीक्षा एकतर रद्द करा नाहीतर ऑनलाईन घ्या ही मागणी होत आहे. आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काय निर्णय घेतात याकडे विद्यार्थांचे लक्ष लागून आहे.

अकोला- जयेश गावंडे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे गर्दी केली. ऑनलाईन परीक्षा किंवा ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वर्षभर ऑनलाइन शिकविले आहे तर ऑनलाइन परीक्षा घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकविता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वर्षभर शाळा या ऑनलाइन होत्या. ऑनलाइन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि मागासभागातील ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली. ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेणे योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका असे सांगत, दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT