SSC-HSC Timetable Saam Tv
महाराष्ट्र

SSC-HSC Timetable: दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दोन पेपरमध्ये ३ दिवसांचे अंतर; वेळापत्रक पाहा

SSC-HSC Timetable News: दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीच्या दोन पेपरमध्ये २-३ दिवसांचे अंतर असणार आहे.

Siddhi Hande

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन विषयांच्या पेपरमध्ये अंतर ठेवले आहे. दोन ते तीन दिवसांचे अंतर ठेवल्याने विद्यार्थ्यांना पुढच्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

दोन विषयांच्या पेपरमध्ये काही अंतर ठेवल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही ताण येणार आहे. जर लागोपाठ सलग पेपर असते तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा. जर वेळ मिळाला नाही तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते, त्यामुळे बोर्डाने पहिल्यांदा दहावी-बारावीच्या परीक्षा १० दिवस आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे बारावीचे पेपर सलग होणार आहेत. परंतु त्यानंतरच्या विषयांच्या पेपरमध्ये दोन ते तीन दिवसांचे अंतर असेल. दहावीचा पहिला पेपर २१ फेब्रुवारीला आहे.तर दुसरा पेपर थेट १ मार्च रोजी आहे. या दोन्ही पेपरमध्ये ९ दिवसांचे अंतर आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ही पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर जवळपास २ आठवड्यांनी लेखी परिक्षेला सुरुवात होणार आहे. याबाबत वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आले आहे. तुम्ही https://mahahsscboard.in/mr या वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक पाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT