Satara Koyana Dam  Saam Tv
महाराष्ट्र

Koyana Dam: मोठी दुर्घटना! कोयनेच्या शिवसागर जलाशयात स्पीड बोट बुडाली, तिघे करत होते प्रवास

Satara Speed Boat Sinks In Koyana Dam: या बोटीतून ३ जण प्रवास करत होते. यामधील एक जण जलाशयामध्ये बुडाला. तर दोघे जण पोहत जलाशयाबाहेर आले. एकाचा शोध सुरू आहे. जावळी गावच्या स्मशानभूमी समोरील जलाशयाच्या पात्रामध्ये ही घटना घडली.

Priya More

साताऱ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोयना धरण (Koyana Dam) शिवसागर जलाशयामध्ये स्पीड बोट बुडाल्याची घटना घडली. शिवसागर जलाशयात वादळी वाऱ्यामुळे स्पीड बोट (Speed Boat) बुडाली. या बोटीतून ३ जण प्रवास करत होते. यामधील एक जण जलाशयामध्ये बुडाला. तर दोघे जण पोहत जलाशयाबाहेर आले. एकाचा शोध सुरू आहे. जावळी गावच्या स्मशानभूमी समोरील जलाशयाच्या पात्रामध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या नदीपात्रात स्पीड बोट बुडाली. जोरदार वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडली. तापोळाकडून बामणोलीच्या दिशेने ही स्पीड बोट चालली होती. ही स्पीड बोट तेटली गावानजीकच्या स्मशानभूमी समोरील नदीपात्रात आली त्यावेळी जोरात वादळ सुरू झाले. या वादळामुळे स्पीड बोट पलटी होऊन जलाशयात बुडाली.

स्पीड बोटवर ३ जण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तिघांपैकी दोघे जण पोहत जलाशयाबाहेर आले. पण एक जण बोटीसोबत बुडाला. या व्यक्तीचा शोध घेण्याचा काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही स्पीड बोट पुलांचा सर्वे करणाऱ्यांची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्पीड बोटवरून जात असताना ही घटना घडली. सध्या पुलांच्या कामावरील कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT