Central railway  saam Tv
महाराष्ट्र

Ashadi Ekadashi : आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या; वाचा सविस्तर

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. संपूर्ण राज्यातील भाविक मोठ्या उत्साहाने विठु-रखुमाईच्या भेटीसाठी जात असतात. वारकरी हरिनामाचा जप करत पंढरपूरला जात असतात. याच आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) पार्श्वभूमीवर पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेची सोय केली आहे. ( Ashadhi Ekadashi 2022 Latest News In Marathi )

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविकांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेची सोय केली आहे. या वर्षी १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. अनेक वारकरी पायी वारीसाठी निघाले आहेत. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पंढरपूरला जाणाऱ्या इच्छुक भाविकांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेकडून सोय आषाढी एकादशीसाठी करण्यात आली आहे. विशेष रेल्वे ९ जुलै २०२२ आणि १० जुलै २०२२ रोजीपर्यंत जालना-पांढरा, नांदेड-पंढरपूर आणि औरंगाबाद-पंढरपूर दरम्यान आषाढी एकादशीसाठी या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. तसेच 07469, 07499 आणि 07516 आषाढी विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू आहे.

भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून चालिवण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेंच्या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

१. जालना - पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक 07468 आषाढी विशेष जालना येथून दि. ९.७.२०२२ रोजी १९.२० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07469 आषाढी विशेष पंढरपूर येथून दि. १०.७.२०२२ रोजी २०.३० वाजता सुटेल आणि जालना येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता पोहोचेल.

थांबे: परतूर, सेलू, मानवत रोड, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टाऊन, कुर्डुवाडी.

संरचना: २ शयनयान, ४ द्वितीय श्रेणी आरक्षित, २ लगेज व गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

नांदेड - पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी नांदेड येथून दि. ९.७.२०२२ रोजी १५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी १०.३५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07499 विशेष पंढरपूर येथून दि. १०.७.२०२२ रोजी २१.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.४५ वाजता नांदेडला पोहोचेल.

थांबे: पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगांव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, तंदूर, सेडम, चित्तापूर, वाडी, कलबुर्गी, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डुवाडी.

संरचना: एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, एक गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक जनरेटर व्हॅन.

3 औरंगाबाद - पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक 07515 विशेष औरंगाबाद दि

९.७.२०२२ रोजी २१.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07516 विशेष पंढरपूर येथून दि. १०.७.२०२२ रोजी २३.०० वाजता सुटेल आणि औरंगाबाद येथे दुसऱ्या दिवशी १२.२० वाजता पोहोचेल.

थांबे: जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, उस्मानाबाद, कुरुडवाडी

संरचना: २ शयनयान, ५ द्वितीय श्रेणी आरक्षित, दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १० सामान्य द्वितीय श्रेणी.

४ भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष

गाडी क्रमांक 01123 विशेष गाडी भुसावळ येथून दि. ९.७.२०२२ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01130 विशेष पंढरपूर येथून दि. १०.७.२०२२ रोजी २२.३०वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता भुसावळला पोहोचेल.

थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी

संरचना: २ शयनयान, २ लगेज व गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT