Special | चक्क सुपारीवर साकारलं बाप्पा अन आंबाबाईचं चित्र! दिलीप कांबळे
महाराष्ट्र

Special | चक्क सुपारीवर साकारलं बाप्पा अन आंबाबाईचं चित्र!

मावळ मधील अनुजाची हस्तकला, पंचक्रोशीतील नागरिकांनी केले कौतुक..!

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुक्यातील अनुजाने कॅनव्हास वर नव्हे तर पूजेत वापरल्या जाणाऱ्या सुपारीवर, झाडांच्या विविध पानांवर विविध कलाकृती साकारल्या आहेत. येणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी आता अनुजा महाराष्ट्रातील विविध देवींची कलाकृती सुपारीवर साकारत आहे. देवींची चित्र सुपारीवर साकारत असताना यातील बारकावे, नक्षीकाम आणि चित्रावर विशेष परिश्रम घेऊन चित्र साकारावे लागते, या सूक्ष्मदर्शी कलाविष्कारासाठी अनेक तास खर्च करावे लागतात.

हे देखील पहा :

विशेष म्हणजे देवीचे दागिने, चेहरा, कपाळी असलेलं कुंकू, मुकुट असे विविध बारकावे हेरून उभेउभ ते सुपारीवर अनुजा साकारत आहे. याआधी अनुजाने गणपती मध्ये सुपारीवर गणपती बाप्पा साकारले होते. इतर वेळी पूजा करताना आपण गणपती म्हणून सुपारी ठेवतो. ती सुपारी तशीच न ठेवता त्यावर गणपती बाप्पा असतील तर दिसायला आणि मनाला देखील छान वाटते म्हणून ही पहिली कलाकृती अनुजाने साकारली.

त्यामुळे तिचे माहेर आणि सासर तिच्या या कलाकृतीवर अत्यंत खुश आहे. अनुजा चित्र काढत असताना अनेक तासांचा कालावधी तिला लागतो. एकावेळी आठ तास सतत बसून ही कलाकृती ती साकारत असते. मात्र, हे ती करत असताना तिला घरच्यांचा देखील पाठिंबा आणि प्रोत्साहन मोठ्या प्रमाणात मिळते. अनुजाचे पती, सासू, सासरे आणि भाऊ हे नेहमीच विविध कलाकृती साकारण्यासाठी तिला प्रोत्साहित करत असतात.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Largest Parrot: जगातील सर्वात मोठा पोपट कोणता?

Anganewadi Jatra: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी गाव आहे तरी कुठे? यात्रेची खास परंपरा

BMC Election: दुबार-तिबार नाही, तर ४ मतदारांची १०३ वेळा नावं, मतदारयादीतला सर्वात मोठा घोळ उघड

Methi Pulao Recipe: टिफिनसाठी पालेभाज्या-चपातीचा कंटाळा आला? ट्राय करा मेथीचा झणझणीत पुलाव, एकदा रेसिपी वाचाच

टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; धाकड ऑलराउंडरचं कमबॅक, शुभमन गिलबाबत घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT