Ajit Pawar, Chhagan Bhujbal, Praful Patel Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेत 'दादा'गिरी चालणार? अजित गटाला विधानसभेत हव्यात 80-90 जागा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेची धामधूम सुरू झालीय. यात सर्वात आघाडीवर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट. अजित पवार गटानं थेट किती जागा लढवणार हेच जाहीर करून टाकलंय.

साम टिव्ही ब्युरो

विनोद पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेच्या जागावाटपात तोंड पोळलेल्या अजित पवार गटानं ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी आतापासूनच जोरदार तयारी केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपाची रणनीती आखलीय.

नाशिक लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळांनी जाहीरपणे विधानसभेसाठी 80 ते 90 जागांची मागणी केलीय. सत्तेत सहभागी होताना तसा शब्द दिल्याचा दावाही भुजबळ करायला विसरले नाहीत. जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होऊ देऊ नका, अशी परखड सूचनाही त्यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांना केली. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''लोकसभेत जागावाटपावरून जी खटपट झाली तशी विधानसभेत नको.''

भुजबळांनी जाहीर भाषणात ही भूमिका मांडल्यामुळे पटेलांनाही कार्यकर्त्यांसमोर जे लोकसभेत घडलं ते विधानसभेत घडणार नाही, असं आश्वासन द्यावं लागलं. प्रफुल्ल पटेल की, ''जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होणार नाही, याची खबरदारी घेऊ.''

महायुतीतला सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपनं मित्रांचा जागावाटपात सन्मान राखण्याचं आश्वासन दिलंय. मात्र भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, हे सांगायलाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत. या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''भाजप सर्वात मोठा पक्ष. मित्रांचा सन्मान राखला जाईल.''

लोकसभेसाठी अजित पवारांना अक्षरशा मित्र पक्षांकडून उमेदवार आयात करावे लागले. स्वपक्षातले केवळ दोनच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीतल्या जागावाटपाच्या वाटाघाटीत मोठी माघार घ्यावी लागल्याची सल अजूनही अजित पवार गटाला बोचतेय. त्यामुळे अजित पवार गटानं आतापासूनच आपलं संपूर्ण लक्ष विधानसभेवर केंद्रीत केलेलं दिसतं. मात्र महायुतीतला सर्वात मोठा भाऊ सर्व्यात लहान भावाला विधानसभेत तरी सन्मान देणार का याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT