पुण्य नगरीत तरुणांकडून खुलेआम ड्रग्ज घेतल्याचं प्रकरण समोर आल्याने खळबळ उडालीय. त्याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील नागरिकांना आवाहन करत 7 दिवस ड्राय डे ठेवण्याचं आवाहन केलंय. त्यावरचा हा खास रिपोर्ट.
शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणं सध्या ड्रग्जचं माहेरघर झालंय. पुण्यात खुलेआम ड्रग्जच्या सेवनाचे हे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आणि सत्तेची झिंग चढलेलं शासन आणि प्रशासन खडबडून जागं झालंय. त्यातच आता पुण्याचे माजी पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी 3 किंवा 7 दिवस पुण्यात ड्राय डे ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्याची मागणी करत पुण्यातील झिंगलेल्या पब आणि बार संस्कृतीवर उतारा सुचवलाय.
काही महिन्यांपूर्वी ललित पाटील येरवडा कारागृहातून ड्रग्जचं रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं आणि पुण्यातील पब आणि बारच्या पार्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर हा मुद्दा काही काळ थंड बस्त्यात गेला होता. मात्र चार दिवसांपुर्वी फर्ग्युसन रोडवरील पबमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्जचं सेवन करत असल्याचं उघड झालं.
त्यानंतर प्रशासनाने अनधिकृत पब आणि बारवर कारवाईला सुरुवात केलीय. मात्र अनधिकृत पब आणि बारचा एवढा सुळसुळाट होईपर्यंत प्रशासन काय झोपलं होतं का? असा सवाल निर्माण होतोय. मात्र पाटलांच्या ड्राय डेच्या प्रस्तावामुळे पुण्यातल्या तळीरामांच्या पोटात गोळा आला असेल एवढं मात्र नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.