Speaker Ramraje Naik Nimbalkar, MLA Jayakumar Gore Saam Tv
महाराष्ट्र

चर्चाच चर्चा ! जयकुमार गाेरेंच्या टीकेनंतर रामराजेंच्या व्हॉट्स ॲप स्टेट्सची चर्चा

सातारा जिल्ह्यात सध्या म्हसवड येथील एमआयडीसी वरून जोरदार राजकारण सुरू आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यात सध्या म्हसवड येथील एमआयडीसी वरून जोरदार राजकारण सुरू आहे. यामध्ये विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि आ.जयकुमार गोरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता विधानरिषद सभापती रामराजें नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्स अॅपवर स्टेट्स ठेवून आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे, व्हॉट्स अॅप स्टेट्सचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.

एमआयडीसी कोरेगावलाच व्हावी यासाठी रामराजेंनी उत्तर कोरेगावमध्ये एक बैठक घेतली होती. यामध्ये कोरेगावमध्ये एमआयडीसी होणे का गरजेचे आहे, हे रामराजे नाईक निंबाळकर लोकांना समजावून सांगत होते. मात्र, यावेळी काही गावांमधील लोकांनी एमआयडीसीला विरोध केला होता.

यामुळे बैठकीत झालेला हा विरोध जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरुनच झाला असल्याचा आरोप रामराजेंनी केला होता, यानंतर भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष आणि माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंना प्रत्युत्तर देत रामराजेंच वय झाल्यामुळे बुद्धीवरचं संतुलन गेले असल्याची टीका केली होती. आता त्यांच वय झाले आहे, त्यामुळे त्यांनी नातवांसोबत खेळण्याच्या वयात राजकारण करत बसु नका असा टोलाही त्यांनी लगावला.

या टीकेला रामराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. Whatsaap status ला त्यांनी नातींचे फोटो शेअर करत "आमदार गोरेंच्या मार्गदर्शना प्रमाणे नातींसोबत" असं या फोटोला कॅप्शन दिली आहे. तर पुढे रडण्याच्या आणि हसण्याच्या इमोजी सुद्धा त्यांनी शेअर करत आमदार गोरेंना टोला लगावला आहे. सध्या त्यांचे हे व्हॉट्स ॲप स्टेटस तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT